रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे १० वे यशस्वी "यामिनी" प्रदर्शन आयोजित.-प्रदर्शनात ९० हून अधिक स्टॉल उपलब्ध :अध्यक्षा रो.कल्पना घाटगे.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

  (अजित निंबाळकर)

दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे.दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने यावर्षी हे प्रदर्शन ६,७ व ८ ऑक्टोबर २०२३ रोजी विक्टोरिया हॉल,सयाजी हॉटेल,कोल्हापूर येथे आयोजित केले आहे.यामिनी प्रदर्शनाचे हे दहावे यशस्वी वर्ष आहे.यावर्षी प्रदर्शनात ९० हून अधिक स्टॉल आहेत.अशी माहिती क्लबच्या अध्यक्षा रो.कल्पना घाटगे,सेक्रेटरी रो.शोभा तावडे,ट्रेझरर रो.ममता झंवर याचबरोबर यामिनीच्या प्रमुख समन्वयक रो.रेणुका सप्रे,रो. आरती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते व डिस्ट्रिक गव्हर्नर रोटेरियन नासिर बोरसदवाला यांच्या उपस्थितीत ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.आजपर्यंत रोटरी क्लब ऑफ गार्गिजने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.अनेक गरजूंना मदत केली आहे.अशा या विधायक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ गर्गिज कोल्हापूरतर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.कोल्हापूर,सांगली इचलकरंजी याबरोबरच दिल्ली,बनारस, गोवा,मुंबई पुणे बेळगाव आणि इतर विविध शहरातून स्टॉल धारक येणार आहेत.व आपले स्टॉल मांडणार आहेत.ड्रेसेस, साड्या, लहान मुलांचे कपडे,ज्वेलरी,डेकोरेटिव्ह वस्तू,स्किन केअर प्रॉडक्ट याबरोबरच रियल ज्वेलरी व डायरेक्ट विणकारांकडून बनारसी व चंदेरी साड्या यांचा यात समावेश आहे.समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद देणे हा मुख्य उद्देश यात असून ते त्यामुळे बचत गट व अंकुर व स्वयम  शाळेतील मतिमंद मुलांनी बनवलेल्या विविध वस्तू आपल्याला प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत.     

या प्रदर्शनातून उपलब्ध निधीतून हॅपी स्कूल करिता विविध उपक्रम,महिला सबलीकरण,गरजूंसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे,विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत,मुलींसाठी सर्वाइकल कॅन्सरचे वैक्सिंग,अशा विविध उपक्रमासाठी वापरला जातो. या प्रदर्शनासाठी क्लबच्या अध्यक्षा रो. कल्पना घाटगे सेक्रेटरी रो.शोभा तावडे ट्रेझरर रो.ममता झंवर याचबरोबर यामिनीच्या प्रमुख समन्वयक रो.रेणुका सप्रे,रो.आरती पवार,रो.दीपिका कुंभोजकर रो प्रीती मर्दा,रो प्रीती मंत्री गिरीजा कुलकर्णी, शेळके,रो.योगिनी कुलकर्णी व त्याचबरोबर सर्व क्लब मेंबर्सनी अथक परिश्रम यासाठी घेतले आहेत. हे प्रदर्शन ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते रात्री ९ आणि ७ व ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे.तरी सर्व कोल्हापूरवासीयांनी या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top