महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ कडून पुणे कोल्हापूर मार्गावर प्रवाशांची संख्या व मागणी लक्षात घेऊन,बसेसच्या फेरीत वाढ.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून, कोल्हापूर- पुणे मार्गावर, प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन,बसेसच्या फेरीमध्ये वाढ करण्यात आली आहे.यापूर्वी कोल्हापूर- पुणे मार्गावर,लाल परीव्यतिरिक्त शिवनेरी,इलेक्ट्रिक शिवाई,शिवशाही बसेस दर अर्ध्या तासाला सोडण्यात येत होत्या.मात्र सध्यपरिस्थितीत प्रवाशांची लक्षणीय संख्या व मागणी लक्षात घेता,कोल्हापूर परिवहन मंडळाने फेऱ्यांची संख्या जवळपास 40 पर्यंत नेली आहे. 

दरम्यान कोल्हापूर- पुणे मार्गावर कोल्हापूर बस स्थानकावरून सकाळी पहाटे 5:00 वाजल्यापासून रात्री 11:00 वाजेपर्यंत बसेसची सेवा उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांमधून अतिशय आनंद व्यक्त होत असून,कोल्हापूर व आसपासच्या परिसरातून बस प्रवाशांचा या कोल्हापूर- पुणे या मार्गावर बस सेवेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.गेले काही दिवस कोल्हापुरातील बस प्रवाशांच्या मधून,कोल्हापूर- पुणे प्रवास मार्गावर,जादा बसेस सोडण्याची मागणी होत होती शिवाय कोल्हापूर बस स्थानक प्रशासनाने प्रवाशांच्या संख्येतील लक्षणीय वाढ लक्षात घेऊन,कोल्हापूर- पुणे मार्गावर जादा बसेस उपलब्ध केल्या आहेत.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top