सांगली जिल्ह्यातील समडोळी येथे,प्रथमाचार्य शांतीसागर महाराज वनराई चे ललित गांधी यांच्या हस्ते उद्घाटन.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगली जिल्ह्यातील समडोळी तालुका मिरज येथे परमपूज्य प्रथमाचार्य श्री 108 शांतीसागर महाराज यांच्या आचार्य पद शताब्दी महोत्सव शुभारंभ निमित्त"प्रथमाचार्य शांतीसागर महाराज वनराई"ची निर्मिती समडोळी स्पोर्ट्स असोसिएशन या संस्थेने केली आहे.या नाम फलकाचे अनावरण जैन अल्पसंख्याक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ललित गांधी यांच्या हस्ते व माजी आमदार प्रा.शरद पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उद्घाटन करण्यात आले. 

यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, महामंत्री प्रा.एन.डी.बिरनाळे,जैन फाउंडेशन चे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील,स्वप्निल शहा,शांतीसागर महाराज जीवन चरित्राचे अभ्यासक डॉ.चंद्रकांत चौगुले,सरपंच सौ.सुनीता हजारे,माजी सरपंच वैभव पाटील,माजी सरपंच महावीर चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य प्रमोद ढोले,आदिगीरी क्षेत्राचे ट्रस्टी बाळासाहेब वग्याणी,रविंद्र खोत,एड.सचिन रुगे,राजकुमार पाटील,ज्येष्ठ नागरिक आदिनाथ मगदूम,राजेंद्र कवठेकर, रोहित चिवटे,श्रेणिक पाटील,बालब्रह्मचारी धवल भैया, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.समारंभाचे अध्यक्षस्थानी प्रथमाचार्य शांतीसागर महाराज आचार्य पद प्रदान राष्ट्रीय शताब्दी समितीचे सदस्य सुरेश पाटील होते.यावेळी श्री.ललित गांधी यांनी श्री.शांतिनाथ जैन मंदिर येथील लक्षद्वीप दीपोत्सव प्रज्वलन करून भ.महावीर व जुने गाव येथील श्री.आदिनाथ जिनमंदीर ला भेट देऊन लक्ष दीपोत्सव समारोह ची पाहणी केली.      

समडोळी गावच्या पंचक्रोशी मध्ये  पर्यावरणाचे संतुलन, संवर्धन व संरक्षण होणेसाठी या वनराई मध्ये भारतीय वंशाच्या देशी व दुर्मिळ रोपांची ग्रामस्थांनी आपला वाढदिवस,आई-वडील व नातेवाईकांच्या स्मरणार्थ एक वृक्ष रोप लावून आपला सहभाग नोंदवला आहे.या सामाजिक उपक्रमाचे आयोजन समडोळी स्पोर्ट्स असोसिएशन चे पदाधिकारी देशभूषण पाटील,अजित ढोले,रविंद्र पाटील,चेतन पाटील,संदीप सुतार, निलेश चव्हाण,ओंकार कोळी यांनी केले.अखिल भारतीय जैन समाजाचे अध्यक्ष ललित  गांधी यावेळी बोलताना व्यक्त केले स्वागत प्रास्ताविक अजित ढोले यांनी शेवटी आभार देशभूषण पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top