सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र येथे यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृहामध्ये,जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे एक दिवसीय शिबिर संपन्न.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे आदेशानुसार आज देवराष्ट्र येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती सभागृहामध्ये सांगली जिल्हा सेवा दलाचे एक दिवसाचे शिबीर पार पडले. या शिबिराची‌ सुरुवात आमदार मोहनराव कदम दादा यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.जिल्हा सेवा दल काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजित ढोले यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात केली.सर्व मान्यवरांचा सत्कार जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे उपाध्यक्ष सुरेश आप्पा घार्गे यांचे हस्ते करण्यात आला.शिबिराच्या आयोजनाची‌ पार्श्वभूमी आणि कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष योगेश महाडिक यांनी केले.

१०.०० ते १२.०० वाजता पहिल्या सत्रामध्ये अजित ढोले यांनी सेवा दलाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा इतिहास व सेवा दल गीते व ध्वजवंदन विधी याबद्दल सखोल माहिती दिली जिल्हा काँग्रेस सरचिटणीस श्री.विजय मोहिते आणि जिल्हा सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष श्री.सुनील जगदाळे यांनी काँग्रेसचा इतिहास व काँग्रेसचे विचारधारा या संदर्भात मार्गदर्शन केले. भोजनानंतर दुपारी दुसऱ्या सत्रामध्ये जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्री.नंदकुमार शेळके यांनी काँग्रेस सेवा दल, काॅंग्रेस पक्षाची वाटचाल आणि संघटनात्मक शिस्त व अनुशासन विषयावर मार्गदर्शन केले.त्यानंतर मोहिते वडगाव येथील प्रा.श्रीकृष्ण मोहिते सर यांनी काँग्रेस पक्षाच्या 138 वर्षाच्या परंपरेबद्दल,पक्षामध्ये कालानुरूप झालेल्या विविध स्थित्यंतराबद्दल,पक्षाची फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून सेवा दलाच्या महत्त्व बद्दल आणि सेवा दलाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्व केलेल्या विविध नेत्यांच्या वाटचालीबद्दल उपस्थित शिबिरार्थींना सविस्तर आणि सखोल मार्गदर्शन केले. सांगली शहर काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी श्री.आशिष कोरी यांनी 2014 पासून झालेल्या सत्ता बदलानंतर भाजपच्या काळामध्ये सध्या परिस्थितीमध्ये देशाला जातीयवादी आणि हुकूमशाही च्या दिशेने देण्याच्या नेण्याच्या भाजपच्या रणनीतीबद्दल कठोर भाष्य करत देश वाचवण्यासाठी त्यांच्या या विघातक कृतीविरोधात व धोरणांच्या विरोधात पक्ष व संघटन पातळीवरती कठोर भूमिका घेतली पाहिजे आणि एकत्रित कृती कार्यक्रम हाती घेऊन देशाच्या उज्वल भवितव्यासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. येणाऱ्या आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये मंडल व बूथ वाईज कसे काम केले पाहिजे या संदर्भात विटा चे राजू राजे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सायंकाळी साडेचार वाजता मौलाना वंटमोरे यांच्या आभारानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. 

यावेळी श्रीधर बारटक्के, विठ्ठलराव काळे, जिल्हा कार्याध्यक्ष अरुण पळसुले,प्रतीक्षा काळे,संध्या कुलकर्णी,अरुणा सूर्यवंशी,महाराष्ट्र प्रदेशच्या राजश्री नलगे पाटील,वाळवा तालुका अध्यक्ष संदीप मोहिते,पलूसचे सुशांत जाधव, खानापूरचे मच्छिंद्र महापुरे,विठाचे बाळासाहेब पाटील, कवठेमंकाळचे महादेव पाटील,इस्लामपूरचे राजू सावकार, प्रमिला महाडिक,अजित कारंडे,डॉक्टर सुरेश सकट,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कडेगाव तालुक्याचे नेते सागरेश्वर सहकारी सूतगिरणीची चेअरमन श्री.शांताराम बापू कदम यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरामध्ये महिला काँग्रेस सेवा झाल्याचे अध्यक्ष सौ.नयना शिंदे यांच्यासह पलूस, कडेगाव,खानापूर,आटपाडी,वाळवा,कवठेमंकाळ तालुक्यांसह सांगली-मिरज सेवा दलाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top