आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचे ई-कार्ड काढण्यासाठी जनजागृती करा - जिल्हाधिकारी राहुल रेखावार.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

कोल्हापूर, दि.4 : केंद्र व राज्य शासनाची महत्वाकांक्षी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना एकत्रित राबविली जाते.ह्या योजनेअंतर्गत १२०९ आजारांवरती आपल्या जिल्ह्यात ५६ खाजगी व ९ सरकारी रुग्णालयात मोफत उपचार केले जाते. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार प्रति कुटुंब प्रति वर्ष १.५ लाखावरून ५ लाखापर्यंत मर्यादा वाढवली आहे.५ लाखापर्यंत उपचाराचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचे ई  कार्ड  सुरु केले आहे.शासन निर्णयानुसार या योजनेअंतर्गत सर्व जनतेस लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार पहिल्या टप्प्यात अंतोदय व प्राधान्य कुटुंब (पिवळे व केशरी) रेशन कार्ड धारक यांचा समावेश करण्यात आला.यातूनच जिल्ह्यात योजनेचे एकूण २४ लाख ८१ हजार १५९ लाभार्थी असून यापैकी आत्तापर्यंत ३,६३,६३३ लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड काढल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधीकारी राहुल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली आयुष्मान भारत ई कार्डबाबत आढावा बैठक पार पडली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील,महानगरपालिका आयुक्त सौ.मंजुलक्ष्मी,जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.राजेश गायकवाड, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.पावरा,जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार,गट विकास अधिकारी,शिक्षण अधिकारी, निवडणूक अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी योजनेचे विभागीय व्यवस्थापक जिल्हा समन्वयक उपस्थित होते.राहुल रेखावर यांनी आयुष्मान भारत ई काढण्याच्या योग्य नियोजनासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समिती नेमण्याची  सूचना दिल्या.या समितीद्वारे कृती आराखडा करून डिसेंबर अखेर पर्यंत जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांचे ई कार्ड काढून १००% उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.तसेच योजनेची जनजागृती होण्यासाठी व आयुष्मान भारतचे ई कार्ड काढण्यासाठी प्रयेक शासकीय कार्यालयात,प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र,उप जिल्हा व ग्रामीण रुग्णालये, नागरी उप आरोग्य केंद्र, रेशन दुकान ग्रामपंचायत दर्शनी भागास योजनेच्या माहितीचे फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.आयुष्मान भारत ई कार्ड व आभा कार्ड हे वेगळे असून आयुष्मान भारत ई कार्ड वरती योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतो व आभा कार्ड हे आजाराची माहिती स्टोर ठेवण्यासाठी आहे.आयुष्मान भारत ई कार्ड आशा वर्कर, ग्रामपंचायत मधील आपले सरकार केंद्र चालक, कॉमन सर्व्हिस सेंटर, रेशन दुकान,योजनेच्या रुग्णालयातील आरोग्य मित्राकडे किंवा स्वतः लाभार्थी काढू शकतो.आयुष्मान भारत ई कार्ड तसेच प्रति दिवस २०००० पर्यंत पूर्ण जिल्ह्यात ई कार्ड काढण्याचे सूचना आरोग्य विभागास देण्यात आले आहे.तसेच रेशन दुकानदारास शिधा वाटप करतेवेळीच लाभार्थ्यांची आयुष्मान भारत ई कार्ड काढण्याच्या सूचना पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आल्या.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top