देशातील मध्य प्रदेश व छत्तीसगड विधानसभेसाठी काल शुक्रवारी झाले मतदान.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

मध्यप्रदेश- काल शुक्रवारी मध्यप्रदेश मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून, निवडणुकीची सर्व जय्यत तयारी पूर्ण झाली आहे,अशी माहिती मध्य प्रदेश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अनुपम राजन यांनी दिली आहे.मध्यप्रदेशांमध्ये जवळपास 230 विधानसभेच्या जागेसाठी मतदान झाले असून, सर्व निवडणूक प्रक्रिया एकाच टप्प्यात पूर्ण झाली आहे. मध्य प्रदेशाच्या एकूण 230 विधानसभेच्या जागांसाठी जवळपास 2533 उमेदवार रिंगणात असून,त्यात 252 महिला उमेदवारांचा समावेश आहे.

छत्तीसगड-छत्तीसगड राज्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या एकूण 70 मतदार संघात मतदान झाले असून, जवळपास 70 मतदार संघातल्या 18 हजाराहून अधिक मतदान केंद्रावर तयारी पूर्ण झाली आहे. छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीसाठी 958 उमेदवार आपले नशीब आजमावत असून,जवळपास 1 कोटी 63 लाख मतदारांनी यासाठी नोंदणी केली आहे.

मध्य प्रदेशामध्ये काल झालेल्या एकाच टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाकडे व छत्तीसगड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील होणाऱ्या निवडणुकीच्या मतदानाकडे,संपूर्ण देशातील राजकीय पक्षांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top