सदर बाजार येथील स्वच्छतागृह दुरुस्तीसाठी आप ची निदर्शने.

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

सदर बाजार निंबाळकर माळ येथील सार्वजनिक स्वच्छ्तागृहांची पडझड झाल्याने स्थानिक नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.एकूण 23 स्वच्छतागृहांपैकी 15 स्वच्छतागृहे खराब झाली आहेत. मोडलेली दारे,चोकअप अशा कारणाने हे स्वच्छ्तागृहे बंद असून यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीने जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली.या स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे.परंतु या संदर्भात महापालिकेकडून दिरंगाई होत आहे.नागरिकांची गैरसोय पाहता महापालिकेने दुरुस्तीचे काम तात्काळ सुरु करावे,लाईट,पाण्याची सोय करावी,मैला टाक्या स्वच्छ करून घ्याव्यात अशी मागणी शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केली.

उप-शहर अभियंता रमेश कांबळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शौचालयांची पाहणी केली. कामाचे अंदाजपत्रक तयार केले असून एका महिन्यात काम सुरु करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सह-संघटक विजय हेगडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.यावेळी संघटनमंत्री सूरज सुर्वे,दुष्यंत माने,आदम शेख,अमरसिंह दळवी,समीर लतीफ,मयूर भोसले,लखन मोहिते,विजय कांबळे,कुमार भोसले,श्रावण बनसोडे,प्रवीण वाघमारे, लिलाबाई ठोकळे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top