राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून श्री सिद्धिविनायक ट्रस्ट कडून रुग्णांना लाखो रुपयांची वैद्यकीय मदत.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची रुग्णसेवा गेली १४ वर्षे अविरतपणे सुरु आहे.राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील तसेच सीमाभागातील हजारो रुग्णांवर दुर्धर आणि खर्चिक असणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. यासह मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष,श्री सिद्धिविनायक ट्रस्ट,शिर्डी संस्थान अशा संस्थाकडून लाखो रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट प्रभादेवी,मुंबई यांचेकडून १३ रुग्णांना मंजूर झालेल्या वैद्यकीय निधी धनादेशाचे वाटप शिवालय,शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय,शनिवार पेठ,येथे करण्यात आले.

यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की,कोणताही जाती–धर्म,मतदारसंघाचा भेदभाव न करता सामाजिक बांधिलकीतून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार ८० % समाजकारण आणि २० % राजकारण या मुलमंत्राप्रमाणे ही रुग्णसेवा अविरत सुरु आहे.राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या वैद्यकीय कार्यास पाठबळ मिळत आहे."शिवालय" च्या माध्यमातून उपचार घेणाऱ्या तसेच आर्थिक मदतीचा लाभ घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातून कोल्हापूर शहरामध्ये विविध आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याकरिता हजारो रुग्ण दाखल होत असतात.त्यातील बहुतांश रुग्ण हे सर्वसामान्य गरीब घरातील असतात. या रुग्णांना उपचारा अभावी परतावे लागू नये,त्यांना दिलासा मिळावा या सामाजिक भावनेतून आमच्या माध्यमातून गेल्या चौदा  वर्षामध्ये १५ हजार रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करणेत आले आहेत.त्याचबरोबर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी,श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट प्रभादेवी,मुंबई यांचेकडून निधी मंजूर करून आधार देण्याचे काम करण्यात आले आहे.गेली १४ वर्षे सुरु असलेली रुग्णसेवा अशीच अविरतपणे सुरु ठेवून,सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्याचे काम यापुढेही करणार असल्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.यासह गरजू रुग्णांनी शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शनिवार पेठ येथे संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट प्रभादेवी,मुंबई यांचेकडून मंजूर झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडे वैद्यकीय मदत निधी धनादेश सुपूर्त करण्यात आला.यामध्ये दीपक पाटील यांचे नवजात शिशु,राहुल लोंगरे यांचे नवजात शिशु, जनार्दन पाटील यांचे नवजात शिशु,मंदार डेंगरे यांचे नवजात शिशु,ऋतिका पाटील यांचे नवजात शिशु,अमोल पाटील यांचे नवजात शिशु, प्रतिक चावरे यांचे नवजात शिशु,सचिन पेडणेकर यांचे नवजात शिशु,आनंदा कांबळे यांचे नवजात शिशु,संतोष सिध्दरा यांचे नवजात शिशु,रोहित खामकर यांचे नवजात शिशु,आरुषु पाटील, इक्बाल गडकरी या रुग्णांना प्रत्येकी रु.२५ हजार प्रमाणे रु.३ लाख २५ हजार इतक्या रक्कमेच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णांच्या नातेवाइकांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण,महानगरप्रमुख शिवाजी जाधव,शहरप्रमुख रणजीत जाधव,उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे,उदय भोसले,किशोर घाटगे,निलेश हंकारे,सुरेश माने,श्रीकांत मंडलिक यांच्यासह रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top