केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी,केंद्रीय पथक,सोमवार ११ डिसेंबर पासून 15 डिसेंबर पर्यंत,महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर.!-

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

केंद्र शासनाकडून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व पाहणी करण्यासाठी,केंद्रीय पथक,11 डिसेंबर पासून 15  डिसेंबर पर्यंत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी,आवश्यक तेवढा पाऊस झाला नसल्याने,दुष्काळ सदृश्य परिस्थिती ओढावली आहे.

केंद्र सरकार महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी,एकूण 12 सदस्यांची विभागणी केलेल्य 4 केंद्रीय पथंके राज्याच्या दौऱ्यावर पाठवत असून,11 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2023 पर्यंत जळगाव, नाशिक,बीड,धाराशिव,जालना,पुणे,सोलापूर आदी ठिकाणी खरीप हंगामातील झालेल्या,पिकांची नुकसानीची पाहणी करणार आहेत. महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा आटोपल्यानंतर, केंद्रीय पथकाची 15 डिसेंबर 2023 रोजी,पुण्यात एक बैठक आयोजित केली असून, त्यानंतर केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top