देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते, दि.17 डिसेंबर 2023 रोजी उद्घाटन होणाऱ्या,मुंबई- कोल्हापूर "वंदे भारत एक्सप्रेस"ला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा नसल्याने,रेल्वे प्रवाशांच्यात प्रचंड नाराजी.!-

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दि.17 डिसेंबर 2023 रोजी उद्घाटन होणाऱ्या,मुंबई- कोल्हापूर "वंदे भारत एक्सप्रेस" ला सांगली रेल्वे स्थानकाला थांबा न दिल्यामुळे, रेल्वे प्रवाशांच्यात प्रचंड नाराजी पसरली आहे.दरम्यान मुंबई- कोल्हापूर "वंदे भारत एक्सप्रेस" ला सांगलीत थांबा न दिल्यास,सांगलीतील नागरिक लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नसल्याचा इशारा, नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर यांनी दिला आहे. 

सध्याच्या परिस्थितीत सांगली रेल्वे स्टेशन हे सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्यात असून,त्या पाठोपाठ कराड व किर्लोस्करवाडी ही उत्पन्न देण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहेत,मात्र सातारा रेल्वे स्थानक कमी उत्पन्न देणारे असले तरी,सातारा रेल्वे स्थानकाला "वंदे भारत एक्सप्रेस"ला थांबा दिला गेला आहे मात्र मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय अधिकाऱ्यांनी,सांगली व किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकाला थांबा दिला नाही अशी माहिती नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली आहे.पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतर सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मध्ये सांगली रेल्वे स्टेशनचा नंबर असून,कोल्हापूर नंतर सांगलीच सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मध्ये रेल्वे स्टेशन आहे.सांगली- लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले असून,यासाठी सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे रेल्वे प्रकल्पासाठी योगदान फार मोठे असून त्यांच्या जमिनी त्यांनी दिलेल्या आहेत.

सांगली जिल्ह्यातील खासदारांनी व लोकप्रतिनिधींनी याबाबतीत अजूनही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांबरोबर चर्चा केली नसून, सांगलीच्या विकासासाठी वरील बाबतीत आवाज उठवून योगदान देणे अनिवार्य झाले आहे.सांगली जिल्ह्यातील खासदार व आमदार प्रतिनिधींनी मुंबई- कोल्हापूर" वंदे भारत एक्सप्रेस" ला सांगली व किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानकावर थांबा मिळवण्यासाठी,रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी प्राप्त करून घ्यावी अशी मागणी नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर व सांगली जिल्ह्यातील तमाम रेल्वे प्रवाशांनी केली आहे.सांगली रेल्वे स्थानकाला वरचेवर मिळत असलेल्या रेल्वे प्रशासनाकडून दुजाभावाच्या वागणुकीबद्दल,सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशामध्ये फार मोठी नाराजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.सांगली जिल्ह्यातील खासदार संजय काका पाटील व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे,सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top