सांगली जिल्ह्यातील कवलापूर विमानतळाचा, प्रवासी वाहतूक तसेच कृषी उड्डाण 2:0 या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षीत योजनेत समावेश करण्यासाठी, खासदार संजयकाका पाटील यांनी,केंद्रीय नागरी उडान मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची दिल्ली येथे घेतली भेट.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथील विमानतळाचा अनेक वर्षा पासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणेसाठी तसेच या विमानतळाचा केंद्र सरकारच्या कृषी उडाण स्किम 2.0 मधे समावेश करुन,प्रवासी वाहतुकी सोबत,जिल्ह्यातील उत्पादित होणारी कृषी आणि फलोत्पादने इत्यादींची वाहतूक असा दुहेरी वापर,कवलापूर विमानतळाचा करता येईल अशा मागणीचे निवेदन खासदार संजयकाका पाटील यांनी केंद्रीय मंत्री श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेवून दिले व विमानतळा बाबत आग्रही भूमिका मांडली.

कवलापूर येथे विमानतळ झाल्यास,सांगली जिल्ह्यातील द्राक्षे,बेदाणे,डाळिंब,हळद व इतर कृषी उत्पादने देशभरात पोहोचविण्यास मदत होईल.सांगली जिल्ह्यातील तरुण शेतकरी शेती मधे क्रांती करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत.त्याचा उत्पादित माल देशभरात जलद पोहोचविण्यास मदत होईल.यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल तसेच कृषी प्रक्रिया उद्योजकांच्या व्यवसाय वाढीस चालना मिळणेस मदत होईल.

 कृषी उत्पादनासोबतच प्रवासी वाहतूक देखील देशभरातील विविध शहरांशी जोडले गेलेस,सांगलीची कनेक्टिविटी वाढेल.सांगलीकरांचा प्रवास सुलभ होईल.नवनवीन उद्योग सांगलीत येतील.जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होवून,सांगली  चे देशभरात नाव उंचावेल.       

या मागणी करते वेळी संजयकाका पाटील सोबत केंद्रीय पंचायत राज मंत्री श्री कपिल पाटील व मा खासदार श्री संजीव नाईक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top