सांगलीत विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींना,जिल्हा काँग्रेस सेवादल पुरस्कार- 2023 वितरण सोहळा संपन्न,! जनप्रतिसाद न्यूज नेटवर्कचे ज्येष्ठ पत्रकार अनिल जोशी यांना "कलाभूषण" पुरस्काराने सन्मानित.!-

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

सांगलीत विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना,जिल्हा काँग्रेस सेवा दल पुरस्कार 2023 देण्यात आला असून,त्यामध्ये आदर्श प्राचार्य म्हणून डॉ.राजेंद्र साहेब मोरे यांना तसेच आमचे न्यूज चॅनलचे जेष्ठ पत्रकार अनिल जोशी यांना कलाभूषण पुरस्कार,प्रा.शिवाजी ए.पाटील यांना आदर्श प्राध्यापक पुरस्कार,समाजभूषण पुरस्कार राजाराम तायाप्पा माने,दादासाहेब बाबू ढेरे,प्रा.डॉ.सिकंदर जमादार, उद्योग भूषण पुरस्कार विजय भगत,उद्योग रत्न पुरस्कार गजानन दिगंबर पोतदार, कलारत्न पुरस्कार गौरी दीपक वायचळ,आदर्श क्रीडाभूषण पुरस्कार वैशाली किरण जाधव, आदर्श शिक्षिका पुरस्कार अर्चना महावीर चव्हाण,आदर्श धन्वंतरी पुरस्कार आलमगीर अब्दुल मुजावर यांचे सह विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींना विविध पुरस्कार देण्यात आले आहेत.

सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले यांनी मनोगतामध्ये,गेली ११ वर्षे जिल्हा सेवा दलातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारा पाठीमागची भूमिका विशद केली तसेच दरवर्षी हा पुरस्कार कार्यक्रम राबवताना,त्यांना आलेल्या अडचणी विशद करताना भावना अनावर झाल्या व त्यावेळी काही काळ कार्यक्रम स्थळी निशब्द शांतता पसरली.त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय जितेश भैय्या कदम यांनी त्यांना,पुढील वर्षापासून होणाऱ्या जिल्हा काँग्रेस सेवा दलातर्फे पुरस्कार कार्यक्रमाला,सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वस्थ केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय जितेश भैय्या कदम यांनी विविध क्षेत्रातील विविध सन्माननीय व्यक्तींचा होत असलेला गौरव व त्यांनी आयुष्यभर विविध क्षेत्रात दिलेले योगदान याचा उल्लेख करीत,सर्व सन्माननीय पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा पुरस्कार देऊन,गौरव करीत कौतुक केले.काँग्रेस नेते जितेश भैय्या कदम यांनी काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांचे मनापासून कौतुक करून, त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्व जण असल्याची ग्वाही दिली.

आजच्या झालेल्या सांगली काँग्रेस जिल्हा सेवा दल पुरस्कार 2023 च्या वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून, सन्माननीय काँग्रेस नेते जितेश भैय्या कदम,सांगली काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील,सांगली काँग्रेस सरचिटणीस सुभाष तात्या खोत आदी मान्यवर व्यक्तींसह सर्व सन्माननीय पुरस्कार प्राप्त व्यक्ती,विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती,सर्वच क्षेत्रातील रसिक प्रेमी वर्ग,जिल्हा काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. सांगलीतील विविध क्षेत्रातील सर्व पुरस्कार प्राप्त सन्माननीय व्यक्तींचे,सर्वत्र हार्दिक अभिनंदन व कौतुक होत आहे. आमच्या जनप्रतिसाद न्यूज नेटवर्कचे ज्येष्ठ पत्रकार यांना मिळालेल्या कलाभूषण पुरस्काराबद्दल त्यांचे,आमच्या जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क च्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन.Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top