शारीरिक आरोग्यासाठी पिंपळाच्या पानांच्या घरगुती आयुर्वेदिक उपायासंबंधी माहिती.!-

0

 आरोग्य भाग-17

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

शारीरिक आरोग्यासाठी पिंपळाच्या पानांच्या आयुर्वेदिक उपायासंबंधी माहिती खाली आम्ही देत आहोत.

१)पोटदुखी

पिंपळाच्या २-५ पानांची पेस्ट बनवून त्यात ५० ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून ३-४ वेळा खा.पोटदुखीवर आराम मिळेल.

२)अस्थमा

पिंपळाच्या झाडाची साल आणि पिकलेल्या फळांची वेगवेगळी पावडर बनवून ती सम प्रमाणात एकत्र करा.आणि हे मिश्रण दिवसातून ३-४ वेळा खा.अस्थमा दूर होण्यास नक्कीच मदत होईल.

३)साप चावल्यावर

 विषारी साप चावल्यावर पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस दोन थेंब घ्या आणि त्याची पाने चावून खा.त्यामुळे विषाचा परिणाम कमी होण्यास मदत होईल.

४)त्वचारोग

पिंपळाची कोवळी पाने खाणे त्वचेच्या रोगांवर उपचारात्मक ठरते.पावलांना भेगा पडणे पिंपळाच्या पानांचा रस भेगा पडलेल्या पावलांवर लावणे,लाभदायी ठरते.

५)रक्ताची शुद्धता

१-२ ग्रॅम पिंपळ बीज पावडरमध्ये मध मिसळून रोज दोन वेळा घेतल्याने रक्त शुद्ध होते.

६)बद्धकोष्ठता

पिंपळाची ५-१० फळे रोज खाल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो.

७)डोळ्यांचे दुखणे

पिंपळाची पाने दुधात बुडवून डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांचे दुखणे कमी होते.

८)दातांचे दुखणे

पिंपळ आणि वडाच्या झाडाची साल घेऊन त्याचे एकत्र मिश्रण बनवा.हे मिश्रण गरम पाण्यात उकळवून त्याने गुळण्या केल्यास दातदुखी दूर होईल.

वरील आयुर्वेदिक उपाय,योग्य त्या आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात यावेत.

सदरहू लेख आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनच्याकडून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top