संपूर्ण देशात घरोघरी,श्री राम ज्योतीचे प्रज्वलन करून, सर्वत्र दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन.-- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी.!-

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

सोशल मीडिया वृत्तसेवा.

संपूर्ण देशवासीयांची अयोध्या क्षेत्रातील भव्य राम मंदिर उभारणीची दिव्य स्वप्नपूर्ती,दि. 22 जानेवारी 2024 रोजी  सुवर्णक्षणी साकार होत असल्याने,देशात घरोघरी देशवासीयांनी श्री राम ज्योत प्रज्वलित करून,सर्वत्र दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कालपासून अयोध्या दौऱ्यावर असून,काल त्यांनी महर्षी वाल्मिकी विमानतळ व नव्या अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले आहे.अयोध्या क्षेत्रातील महर्षी वाल्मिकी विमानतळ व नव्या अयोध्या धाम रेल्वे स्थानकाच्या विकास कामावर,आत्तापर्यंत हजारो रुपये कोटींचा खर्च करून,काल लोकार्पण करण्यात आले आहे.काल अयोध्याक्षेत्री सर्वत्र भगवेमय वातावरण दिसत होते,शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोडशोमुळे, रस्त्याच्या दुतर्फा फार मोठी गर्दी झाली होती. 

संपूर्ण देशवासीयांना अयोध्याक्षेत्री,दि.22 जानेवारी 2024 रोजीच्या,श्री राम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक सुवर्ण सोहळा क्षणी यावेसे वाटणे स्वाभाविक आहे.परंतु हे शक्य नसल्याने,सर्व रामभक्तांनी,त्या दिवशी, देशात सर्वत्र श्रीराम ज्योत प्रज्वलित करून,दीपोत्सव साजरा करावा असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दि. 22 जानेवारी 2024 रोजी श्री राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा ऐतिहासिक सुवर्णक्षणाचा सोहळा पार पडल्यानंतर,देशातील सर्व नागरिकांनी श्री राम लल्लाच्या दर्शनासाठी,आपापल्या सोयीनुसार,अयोध्या क्षेत्री यावे असे त्यांनी आवाहन केले. 

अयोध्या क्षेत्री होणाऱ्या दि. 22 जानेवारी 2024 रोजीच्या श्रीराम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक सुवर्ण सोहळ्यासाठी,जवळपास 8000 जणांना निमंत्रित करण्यात आले असून,सध्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.एकंदरीतच देशातील देशवासीय,दि. 22 जानेवारी 2024 च्या श्रीरामलाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक सुवर्ण सोहळा क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top