शारीरिक आरोग्यासाठी लागणाऱ्या आवश्यक खनिजांसंबंधी उपयुक्त माहिती.!--

0

 आरोग्य भाग- 19

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

◾कॅल्शियम

शरीरासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम हे शेंगदाणे,तीळ, दूध,खोबरे,मुळा,कोबी,ज्वारी,राजगिरा,खरबूज,खजूर यातून मिळते.यामुळे शरीरातील सर्व हाडांची मजबुती व निर्मितीसाठी आवश्यक असा उपयोग होतो.

◾लोह

लोह हे खनिज खजूर,अंजीर,मनुका,सफरचंद,डाळिंब,पालक, सीताफळ,ऊस,बोर,मध,पपई आणि मेथी यामधून मिळते.हे शारीरिक वाढीसाठी अत्यंत आवश्यक असे खनिज आहे.

◾सोडियम

शरीरासाठी आवश्यक असणारे सोडियम हे खनिज मीठ, पाणी,बटाटा,आलं,लसूण,कांदा,मिरची,पालक,सफरचंद, कारलं यातून मिळते.शारीरिक आरोग्यातील महत्त्वाची असणारी पाचक रसायन निर्मिती यामुळे होते.शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.

◾आयोडीन

शरीरासाठी आवश्यक असणारे आयोडीन हे खनिज काकडी, शिंघाडा,कोबी,राजगिरा,शतावरी,मीठ,लसूण यामध्ये मिळत असून,यामुळे शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून, मेंदूला बचाव करण्याचे काम हे कधीच करते.

◾पोटॅशियम

पोटॅशियम हे शरीराला आवश्यक लागणारे महत्त्वाचे खनिज असून,हे सर्व प्रकारची धान्ये,डाळी,संत्री,अननस,केळी,बटाटा, लिंबू,बदाम यातून मिळत असून,शरीरातील तंतू व यकृत यांना सुरळीत ठेवण्याचे कार्य करते.

◾फॉस्फरस

शरीरासाठी आवश्यक असणारे फॉस्फरस हे खनिज दूध, पनीर,डाळी,कांदा,टोमॅटो,गाजर,जांभळ,पेरू,काजू,बदाम, बाजरी यातून मिळत असून,यामुळे मेंदूला ताजेतवान ठेवण्याचे काम हे खनिज करते.

◾सिलिकॉन

शरीरासाठी आवश्यक असणारे खनिज सिलिकॉन हे गहू, पालक,तांदूळ,कोबी,काकडी,मध,यामधून मिळत असून, त्यामुळे जननेंद्रियाची कार्यक्षमता वाढून शरीरातील तंतूंना मजबूत करते.

◾मॅग्नेशियम

शरीरासाठी आवश्यक असणारे मॅग्नेशियम हे खनिज बाजरी,बीट,खजूर,सोयाबीन,दूध,लिची,कारलं यातून मिळत असून,यामुळे शरीराच्या पेशींचे कार्य सुधारून,रेचक म्हणून काम करते.

◾सल्फर

शरीरासाठी आवश्यक असणारे सल्फर हे खनिज दूध,पनीर, डाळ,टोमॅटो,बटाटा,आलं,मिरची,सफरचंद,अननस,सुरण यातून मिळत असून,यामुळे शरीराच्या इन्शुलिनचे रेचन म्हणून कार्य निर्मिती करण्यास मदत होते.

◾क्लोरीन

शरीरासाठी आवश्यक असणारे क्लोरीन हे खनिज बीट, कोबी,मीठ,दूध,लिंबू,आवळा,मध,यामधून मिळत असून, यामुळे शरीरातील पचन निर्मिती व शरीरातील आम्लक्षरांचे संतुलन राखण्यास मदत होते.

या लेखाचे शब्दांकन श्री अनिल जोशी यांनी केले असून, जनहितार्थ माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top