‘सन मराठी’ प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ कार्यक्रम १० डिसेंबरला कोल्हापूरमध्ये.!-

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क:

(अजित निंबाळकर)

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कायम सज्ज असलेली ‘सन नेटवर्क’ची ‘सन मराठी’ वाहिनी कोल्हापूरकरांसाठी ‘मनोरंजनाचा मेळा’ भरवणार आहे आणि हा मेळा प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन करेल याकडेही सन मराठीने विशेष लक्ष दिले आहे. ‘मेळा मनोरंजनाचा’ या कार्यक्रमात संगीत, नृत्य असा मनोरंजनाचा नजराणा असणार आहे. हा कार्यक्रम दमदार होणार कारण सिनेसृष्टीतले आघाडीचे कलाकार प्रेक्षांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. सोनाली कुलकर्णी, हर्षदा खानविलकर, मीरा जगन्नाथ, रोहित राऊत, मीरा जोशी, सोनाली पाटील, संदीप पाठक, कविता राम यांचे दिमाखदार कलाविष्कार या कार्यक्रमाला नक्कीच रंगत आणतील‘. याच सोबत सन मराठी वाहिनीच्या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी सुद्धा कोल्हापूरकरांना मिळणार आहे.  

सोहळा नात्यांचा’ असं ब्रीदवाक्य असणा-या या वाहिनीने त्यांच्या मालिकेतून प्रेक्षकांसोबत असलेलं नातं अतिशय घट्ट केलं असून त्यांच्या मनोरंजनासाठी सतत नवनवीन कार्यक्रम आयोजित करण्याकडे त्यांचा कल जास्त आहे. त्यापैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘मेळा मनोरंजनाचा’ जो होणार आहे छत्रपतींचा वारसा जपणा-या  आपल्या कोल्हापूर शहरात.

‘सन मराठी’ प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ हा कार्यक्रम येत्या १० डिसेंबर रोजी कोल्हापूर येथील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. या मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी शुल्क आकारण्यात आलेले नसून प्रेक्षकांसाठी प्रवेश विनामूल्य असेल. मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी सहभाग घ्यावा आणि आपली १० डिसेंबरची संध्याकाळ मनोरंजक करावी

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top