नागपूर येथील काँग्रेसच्या महारॅलीत सांगलीतून हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग राहणार.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

 २८ डिसेंबर हा आखिल भारतीय कॉग्रेस पक्षाचा स्थापना दिन आहे.देशाला स्वातंत्र मिळवून दिलेल्या आणि स्वातंत्र्यानंतर देशाची चौफेर प्रगती करण्यासाठी अहोरात्र झटलेल्या कॉंग्रेस पक्षाला १३८ वर्षे झाली.स्थापना दिनाचे औचित्य साधून पक्षानं नागपूरात चाळीस एकराच्या विस्तीर्ण भारत जोडो मैदानात 'है तय्यार  हम' या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवणाऱ्या महारॅलीचे काँग्रेस पक्षाने दि.२८ डिसेंबर रोजी आयोजन केलेले आहे. 

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मंल्लीकार्जुन खर्गे, कॉग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी,माजी अध्यक्ष खासदार राहूलजी गांधी,कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी,प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले राष्ट्रीय व राज्य स्तरीय सर्व कार्यकारणी पदाधिकारी,सदस्य,कॉग्रेसशासीत राज्यांचे सर्व माजी आजी मुख्यमंत्री,खासदार व आमदार,विरोधी पक्ष नेते,व कार्यकर्ते मिळून 10 लाख लोकांची महारॅली असेल,या महारॅलीत सांगली जिल्हयातून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य,सर्व फ्रंटल संघटना,सेल विभागाचे पदाधिकारी,सदस्य व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सहभागी होणार आहेत.अशी माहिती सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी कॉंग्रेस भवन येथे आयोजित विविध विभागांच्या प्रमुखांच्या बैठकीत दिली.यावेळी प्रमुखांनी आपआपल्या भागात महारॅली सहभागाबाबत,प्रबोधन करावे व मोठया संख्येनी सहभागी व्हावे,असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे. 

यावेळी अशिष कोरी,आप्पासाहेब पाटील,तोफीक शिकल्लगार,अशोकसिंग रजपूत,अजित ढोले,ताजूद्दीन शेख, प्रा.एन.डी.बिरनाळे,राजेंद्र कांबळे,अजय देशमुख,अमित बस्तवडे,अरूण पळसूले,श्रीधर बारटक्के,किरण कांबळे, सूखदेव बुवा,विठ्ठल काळे,प्रकाश माने,याकुब मणेर,चैतन्य पाटील,अल्लाबक्ष मुल्ला,मारूती देवकर,अजित भांबुरे,अनिल मोहीते,सलमान मेस्त्री,तेजस भंडारी,सौ.प्रतिक्षा काळे,सौ. कांचन खंदारे,सौ.सिमा कुलकर्णी,सचिन चव्हाण,शैलेंद्र पिराळे,पैगंबर शेख,आयुब निशाणदार,सनी धोतरे,अर्जुन मजले,शंकर ऐवळे,चंद्रकांत डिगे,अरूण गवंडी,पृथ्वीराज चव्हाण व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top