इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ अध्यक्षपदी संभाजी गुरव,तर उपाध्यक्षपदी बसवराज कोटगी.!-

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

येथील इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी संभाजी गुरव यांची तर उपाध्यक्षपदी बसवराज कोटगी यांची शनिवारी संघटनेच्या झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली.त्याचबरोबर शिवानंद रावळ यांची तर सचिवपदी महावीर चिंचणे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.

इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी बैठकी आयोजित केली होती.या बैठकीत सर्व निवडी एकमताने बिनविरोध करण्यात आल्या. अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष धर्मराज जाधव होते.

बैठकीच्या प्रारंभी मावळते अध्यक्ष धर्मराज जाधव यांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामकाजाचा आढावा घेत भविष्यातही संघटनेच्या प्रगतीसाठी सदैव कार्यरत राहू अशी ग्वाही दिली.निवडीनंतर नुतन पदाधिकार्‍यांना सत्कार करुन त्यांच्यापुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नूतन पदाधिकार्‍यांनी आगामी वर्षभरात नवनवीन उपक्रम राबवून संघटनेतील सभासदांना त्याचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही दिली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे,अनिल दंडगे,चिदानंद आलुरे,पंडित कोंडेकर,बाबासाहेब राजमाने,अतुल आंबी,  हुसेन कलावंत,सुभाष भस्मे,शितल पाटील,महेश आंबेकर,  डॉ.पांडुरंग पिळणकर,भाऊसाहेब फास्के,छोटुसिंग रजपूत, इराण्णा सिंहासने,व विजय चव्हाण उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top