सांगली जिल्हाचे विविध रेल्वे प्रश्न सोडवण्यासाठी,खासदार संजयकाकांनी परत एकदा घेतली रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट.!-

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

खासदारांच्या ठळक मागण्या...

1) जागतिक हळदी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली स्टेशनवरून हळदी उत्पादन क्षेत्र निजामाबाद जाणेसाठी सांगली-निजामाबाद हळदी नगरी एक्सप्रेस गाडीची मिरज जंक्शन मार्गे मागणी.सांगली,मिरजेतून तेलंगणा,आंध्र प्रदेश भागात जाण्याची सोय होईल.

2) सांगली,मिरज दोन्ही स्थानकात वंदे भारत गाडीचा थांबा.

3) सांगली स्थानकात संपर्क क्रांतीचा थांबा.

4) किर्लोस्करवाडीत दादर-हुबळी एक्सप्रेसचा थांबा.

5) सांगलीतून दिवसाच्या वेळेला कर्नाटक बेळगाव,धारवाड, हुबळी जाणारी सांगली-बेंगलोर एक्सप्रेस गाडीची मागणी.

6) सांगली जिल्हातील वारकरी विठ्ठल भक्तांसाठी सांगली स्टेशन व विश्रामबाग स्टेशनवरुन पंढरपूर,लातूर जाणारी गाडी सुरू करण्याची विषेश मागणी.

7) सिमा भागातील जत व कवठेमहांकाळ तालुक्यांना जिल्हा मुख्यालय सांगली व विश्रामबागला जोडणारी थेट गाडीची मागणी.

8) सांगली स्थानकात प्रवासी दुप्पट वाढल्याने काही गाड्यांना 3 मिनिटांचा थांबा वाढवून 5 मिनिट करण्याची मागणी.

9) कोल्हापूर-किर्लोस्करवाडी लोकल गाडीची मागणी.जिल्हातील भिलवडी,किर्लोस्करवाडी उद्योगिक क्षेत्र व तासगाव,पलूस,मिरज तालुक्यांचा संपर्क वाढविणारी गाडी.

10) सांगली स्टेशनवर गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधा.सांगली स्थानकावरून नविन गाड्या,सुरू होऊ शकतील.या गाड्या मिरज स्टेशनवर थांबून पुढे जातील. त्यामुळे मिरज स्टेशनचा संपर्क देखील वाढेल.

11) सांगली स्थानकात प्रत्येक प्लॅटफाॅर्मवर लिफ्ट व एस्कलेटर(सरकता जिना)ची मागणी.वयस्क नागरीक,गरोदर महीला,रुग्ण व लहान मुलांची होणार सोय.

12) सांगली स्थानकात बाहेरगावातून येणाऱ्या शेतकरी व व्यापाऱ्यासाठी माफक दरात राहणेसाठी रिटायरींग रूम व सामान ठेवण्यासाठी क्लोक रुमची मागणी.व्यापारी,पर्यटक व शेतकर्यांना होणार मोठा फायदा.

13) सांगली स्थानकात पूर्व दिशेने प्रवेशसाठी पुलाची मागणी.विश्रामबाग,कुपवाड,संजयनगर,शिंदेमळा,अभयनगर, माधवनगर येथून सांगली स्थानकात येणे सोपे होईल.

14) भविष्यात सुरू होणार्या प्रत्येक नविन रेल्वे गाडीला मिरज सोबत सांगली स्थानकावर थांबा देण्यात यावे.

खासदार संजय काका पाटील यांनी मागच्या आठवड्यात मुंबई येथे रेल्वे राज्यमंत्री व रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सांगली जिल्ह्यातील वसगडे येथील शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न सोडवला होता.त्याचप्रमाणे सांगली शहरातील चिंतामणी नगर माधव नगर परिसरातील रेल्वे पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे ही मागणी देखील खासदारांनी रेल्वे मंत्र्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली होती रेल्वे राज्य मंत्र्यांनी तशा प्रकारचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्यामुळे चिंतामणी नगरचा पूल देखील लवकर पूर्ण होईल अशी खात्री आहे.त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील माथाडी हमालांच्या प्रश्नासाठी सांगली व मिरज रेल्वे स्थानकांवरील माल धक्क्यामध्ये काही सुधारणा करण्याची मागणी देखील खासदारांनी केली होती त्यावर रेल्वे राज्य मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते.आता परत खासदार संजय काका पाटील यांनी दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्र्यांची विशेष भेट घेऊन सांगली जिल्ह्यातील विविध रेल्वे प्रश्नांबाबत त्यांना निवेदने सादर केलेली आहे.या मागण्यांमध्ये विशेष म्हणजे मुंबई-कोल्हापूर वंदे भारत गाडी लवकरात लवकर सुरू करून या वंदे भारत सेमी बुलेट ट्रेन गाडीला सांगली जिल्ह्यातील सांगली व मिरज या दोन्ही रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात यावा याबाबत विनंती केली.

सांगली रेल्वे स्थानकातून सकाळी सात ते रात्री दहा वाजल्या पर्यंत बेळगाव हुबळी धारवाड गोवा कडे जाणारी गाडी नसल्याचे खासदारांनी रेल्वे मंत्र्यांच्या निर्दशनास आणून दिले व सांगली स्टेशन वरून दिवसाच्या वेळेत कर्नाटक व गोवा जाणारी गाडी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी देखील केली.सांगली जिल्ह्यातील वारकरी विठ्ठल भक्तांची अनेक वर्षांची मागणी होती की विठोबाच्या दर्शनासाठी त्यांना सांगली व विश्रामबावी या दोन रेल्वे स्टेशन वरून पंढरपूर जाणारी थेट रेल्वे गाडी मिळावी या मागणीबाबत देखील खासदारांनी रेल्वे मंत्र्यांना मागणी केली.जत व कवठेमहांकाळ तालुक्यांना जिल्हा मुख्यालय सांगली व विश्रामबाग या दोन रेल्वे स्टेशनची जोडणारी गाडीची पूर्तता करण्याची मागणी खासदारांनी केली.जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी किर्लोस्करवाडी व भिलवडी औद्योगिक शहरांना कोल्हापूर,मिरज व सांगलीशी जोडण्यासाठी किर्लोस्करवाडी-कोल्हापूर लोकल रेल्वे सेवेची मागणी केली.ज्याच्यामुळे जिल्ह्यातील तासगाव पलूस व मिरज या तीन तालुक्यांना फायदा होईल.सांगली रेल्वे स्टेशनवर नवीन सोयीसुविधा उत्तर रेल्वे स्टेशन प्रमाणे व्हाव्यात ही मागणी देखील खासदारांनी केली,यामध्ये प्रामुख्याने सांगली रेल्वे स्टेशनवर लिफ्ट बसविण्यात यावी,सांगली रेल्वे स्टेशनवर माफक दरात राहण्यासाठी रिटायरिंग रूम व व्यापाऱ्यांना आपले सामान ठेवण्यासाठी क्लॉक रूमची सुविधा देण्याची मागणी खासदारांनी केली.  

सांगली जिल्ह्याचा संपर्क वाढवण्यासाठी मिरज बरोबरच सांगली रेल्वे स्टेशन वरून देखील काही गाड्या सुरू व्हाव्यात, यासाठी खासदारांनी सांगली रेल्वे स्टेशनवर गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधा निर्माण करण्याची मागणी केली.या सुविधेमुळे सांगली रेल्वे स्टेशन वरून काही नव्या गाड्या सुरू होतील ज्या मिरज येथे थांबून पुढे जातील.ज्याचा फायनान्स सांगली व मिरज या दोन्ही रेल्वे स्टेशनला होणार आहे.सांगली ही जागतिक हळदी व्यापारचे केंद्र असून निजामाबाद हे देशातील प्रमुख हळदी उत्पादन क्षेत्र आहे सांगली-निजामाबाद हळदी नगरी एक्सप्रेस रेल्वे गाडी सुरू करून निजामाबाद इथून सांगलीत हळदी विक्री करण्यासाठी येणारे शेतकरी व व्यापारी यांची सोय करण्यासाठी प्रमुख्याने खासदारांनी मागणी केली आहे.सांगली जिल्ह्यातील व्यापार वाढीला ही गाडी अत्यंत फायद्याची ठरू शकेल. 

पुणे-लोंढा-बेंगलुरु हा देशातील रेल्वे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचा एक प्रचंड मोठा मेगा प्रोजेक्ट खासदार संजय काकांनी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची अनेक वेळा भेट घेऊन मंजूर करून घेतला होता.सांगली जिल्ह्यातून जाणारा हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प आता पूर्णत्वात आला आहे. त्याचा फायदा सांगली जिल्ह्यातील मिरज जंक्शन सोबत सांगली, किलोस्करवाडी जत कवठेमंकाळ,विश्रामबाग व भिलवडी सारख्या इतर रेल्वे स्टेशनला होणार आहे.भविष्यात सांगली रेल्वे स्टेशन व मिरज जंक्शन येथून नव्या गाड्या देखील सुरू होतील.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top