कोल्हापुरात श्री विद्या शक्तिपात महायोगाश्रम संचलित,श्री. अनघादत्तधाम कोल्हापूर या संस्थेचा भूमिपूजन समारंभ संपन्न.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

कोल्हापुरात आज,श्री शविद्या शक्तिपात महायोगाश्रम संचलित,श्री.अनघादत्तधाम या संस्थेचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.समाजाची सर्वांगीण प्रगती व धार्मिक अधिष्ठाना सोबतच,संस्कारक्षम विकासा‌करिता असे धार्मिक उपक्रम ही काळाची गरज असल्याने श्रीअनघादत्तधाम या प्रकल्पास आमच्या सदैव सक्रिय शुभेच्छा आहेत.आज समाजापुढे असणारी आव्हाने आणि समस्या यामधून समाजाला दिशा मिळण्याची गरज आहे.श्री छत्रपति शाहू महाराजांच्या करवीर नगरी मध्ये आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई मातेच्या आशीर्वादाने असा प्रकल्प उभा राहणे हा कोल्हापूरकरांच्या दृष्टीने खरोखरच भाग्याचा क्षण आहे, असे श्रीमंत मालोजीराजे छत्रपति यांनी यावेळी प्रतिपादन केले. अशा प्रसंगी समाजातील सर्वांनीच सौहार्दाने एकत्रित राहून उपासना करण्याची आपल्या सर्व कोल्हापूरकरांची परंपरा पूर्वीपासून आहे,त्यामुळे या श्रीविद्या शक्तिपात महायोगाश्रम तर्फे भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा सर्वांना नक्की लाभ होईल अशी खात्री व्यक्त करुन त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.याप्रसंगी बोलताना विश्वपंढरी या धार्मिक संस्थेचे पू. श्री आनंदनाथ महाराज यांनी हा उपक्रम म्हणजे श्री दत्तात्रेय प्रभू आणि करवीर निवासिनी श्री अंबा मातेच्या आशिर्वादाचे फलस्वरुपाने समस्त कोल्हापूरकरांना मिळालेला उत्तम प्रसाद असून जास्तीत जास्त साधक-उपासकांनी याचा लाभ करून घेऊन आत्मकल्याण साधावे,असे आशीर्वचन व्यक्त केले. संस्थेच्या प्रत्येक उपक्रमास सदैव पाठिशी उभे राहून भविष्यातील सर्व कार्यक्रमांस शुभेच्छा व्यक्त केल्या.

 याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत मालोजीराजे छत्रपति, जिल्हा पोलिसप्रमुख श्री महेंद्र‌जी पंडित,विश्वपंढरी संस्थेचे पू. श्री आनंद‌नाथ महाराज,श्रीवि‌द्या शक्तिपात महायोग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुहास जोशी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेदमूर्ती सुहास जोशी गुरुजी यांनी,निवेदन श्री ओंकार नवलिहालकर यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव ॲड्.केदार मुनीश्वर यांनी केले. 

यावेळी श्री प्रवीण पाटील,ॲड्.श्री सासने,श्री दिगंबर जोशी, श्री बाजीराव जिल्हेदार,श्री काशिदसर,श्री अजित पाटील (बेनाडीकर) श्री सिद्धार्थ शिंदे,श्री अभिजित रेणावीकर, ऐश्वर्या मुनीश्वर,श्री सुनील जोशी,श्री राजू मेवेकरी यांसह

संस्थेचे सर्व विश्वस्त व जिवबा नाना जाधव पार्क परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top