कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे परम गुरु नृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा,दि. 07/01/2024 वार रविवारपासून दि.13/01/ 2024 वार शनिवार पर्यंत साजरा होणार.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे परमगुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा,दि.07/01/ 2024 वार शनिवार पासून दि.13/01/2024 पर्यंत संपन्न होणार आहे.

◾जन्मोत्सव काळात मंदिरात होणारे कार्यक्रम खालील प्रमाणे.!-

१)पहाटे 5:00 वाजता काकड आरती.

२)सकाळी 7:00 वाजता लघु रुद्र अभिषेक,श्रीमद गुरुचरित्र पारायणे.

३)दुपारी 12:00 वाजता श्रीचरणकमल महापूजा.

४)दुपारी 04:00 वाजता वेधशास्त्र संपन्न दिलीप शास्त्री उपाध्ये यांचे पुराण.

५)सायंकाळी 05:30 वाजता ह.भ.प. वासुदेवबुवा बुरसे रा.पुणे यांचे कीर्तन.

६)सायंकाळी 7:00 वाजता धुप,आरती व पालखी सेवा.

७)रात्री 10:00 वाजता शेजारती.

८)सोमवार दि. 08/01/ 2024 रोजी सकाळी 08:00 वाजता श्रींचे मुख्य मंदिरात" पवमान स्वाहाकार" संपन्न होणार आहे. 

तरी सर्व दत्त भक्त-भाविकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्रीक्षेत्र नृसिंहवाडी देवस्थान समितीने केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top