सांगलीचे जनसेवेत मग्न असलेले खासदार संजय काका पाटील यांचा वाढदिवस,दि.4 जानेवारी 2024 रोजी,जिल्ह्याच्या पूर्ण झालेल्या विविध विकास कामाच्या वचनपूर्तीने साजरा होणार.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)


सांगलीचे लोकप्रिय व जनतेच्या सेवेत मग्न असलेले खासदार श्री संजय काका पाटील यांचा वाढदिवस,दि.4 जानेवारी 2024 रोजी,सांगलीतील मराठा समाज मंगल कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल रोड सांगली येथे,जिल्ह्यात पूर्ण झालेल्या विकास कामाच्या वचनपूर्तीने साजरा होणार आहे.

त्यांनी जिल्ह्यातील पूर्ण केलेल्या विकास कामांमध्ये जत म्हैसाळ विस्तारित योजना,टेंभू योजना,ताकारी म्हैसाळ जलसिंचन योजना,पुणे- मिरज- लोंढा दुहेरी व विद्युतीकरण रेल्वे मार्ग,विजापूर -गुहागर राष्ट्रीय मार्ग,सांगली- पेठ राष्ट्रीय महामार्ग,सांगली- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग,सांगोला- उमदी- विजापूर राष्ट्रीय महामार्ग,विविध रेल्वे उड्डाणपूल व इतर लोकोपयोगी विकास कामे आदींचा समावेश आहे.

सांगलीतील मराठा समाज मंगल कार्यालय,सिव्हिल हॉस्पिटल रोड येथे सायंकाळी ठीक 5:00 वाजता शुभेच्छा स्वीकारणार आहेत.सांगली जिल्ह्यातील विटा येथे कोहिनूर मंगल कार्यालय सकाळी ठीक 9:00 वाजता शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

 सांगलीचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील वाढदिवस समितीने,खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त,हार- तुरे- बुके न आणता,पुस्तक व वह्या आणून,भेट स्वरूपात द्याव्यात असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top