शारीरिक आरोग्यात नाकाचे हाड वाढण्यासंबंधी असलेल्या समज- गैरसमजाविषयी उपयुक्त माहिती.!--

0

 आरोग्य भाग- 34.

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

बऱ्याचदा शिंका येण्याचे कारण वेगळेच असते.बरेचदा हाड वाढले,अशी समजूत असते.खरेतर नाकाचा पडदा; ज्याला सेप्टम असे म्हणतात, तो एका बाजूला थोडा वाकलेलाच असतो.अगदी सरळ असा कोणाचाच नसतो. दोन नाकपुड्यांना वेगळे करणारा हा पडदा उपास्थी (कार्टिलेज) आणि हाडांनी बनलेला असतो आणि सगळ्याच व्यक्तींमध्ये या पडद्यात बाक असतो. त्याचा त्रास होत असेल,तर लक्ष द्यायला हवे.एरवी नुसता बाक असणे,हे काळजीचे कारण नाही.या पडद्याला बाक दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे, एकाच नाकपुडीत जास्त बाक. हा इंग्रजी ‘सी’ या मुळाक्षरासारखा असतो. दुसरा म्हणजे, दोन्ही नाकपुड्यांमध्ये आसणारा बाक. हा इंग्रजी ‘एस’ या मुळाक्षरासारखा असतो. असा बाक जन्मत:च असू शकतो किंवा नाकाला अथवा चेहऱ्याला मार बसल्यास पडद्याला बाक येतो.पडद्याला किती बाक आहेत, त्यावरून कधीकधी नाक बाहेरूनही वाकडे दिसू शकते. नाकाला जास्त बाक असेल,तर त्याची लक्षणे म्हणजे,ज्या बाजूला नाक वाकलेय तिकडे श्वास घेताना अडथळा येतो.नीट श्वास घेता येत नाही.या अडथळ्यामुळे नाकाच्या त्या बाजूला असलेल्या सायनसमध्ये संसर्ग होतो,घोरणे सुरू होते,नाकातून रक्त येते.कानाच्या समस्याही निर्माण होतात.जसे कानाचा पडदा आत ओढला जाऊ शकतो,कानात पाणी होऊ शकतं,तात्पुरता बहिरेपणा येऊ शकतो.

नाकाच्या पडद्याला बाक आल्याने हे त्रास होत असतील,तर त्यावरील उपचार म्हणजे शस्त्रक्रिया.एक शस्त्रक्रिया आहे सेप्टोप्लास्टी.नाकाचा जेवढा भाग वाकलेला आहे,त्या भागावर ही शस्त्रक्रिया केली जाते.दुसऱ्या प्रकारची शस्त्रक्रिया आहे सबम्युकस रिसेक्शन (एसएमआर).एसएमआरमध्ये उपास्थी आणि हाड दोन्ही पूर्णपणे काढले जाते. त्यामुळे फक्त उपास्थी आणि हाड यावर आवरण घालणारे पटल (मेम्ब्रेन) उरते.नाक बाहेरूनही वाकडे दिसत असेल,तर सेप्टोप्लास्टीबरोबर हायनोप्लास्टी पण केली जाते.या शस्त्रक्रियेसाठी देण्यात येणारी चीर बाहेर दिसत नाही. त्यामुळे त्याचा व्रणही दिसत नाही.बरेचदा रुग्णांना खूप शिंका येणे,नाकातून पाणी वाहणे, असा त्रास होते.रुग्णाला वाटते,हाड वाढले आहे.पण ही लक्षणे एलर्जीची असतात.त्याचा नाकाच्या पडद्याला बाक येण्याशी काही संबंध नसतो.ऑपरेशन केले,तरी हा त्रास जात नाही. धूळ,पराग कण,घरात कुत्रा-मांजर असतील तर त्यांचे केस, सौंदर्यप्रसाधने,परफ्युम,काही विशिष्ट खाद्यपदार्थ,प्रदूषण यामुळे एलर्जी होते.एलर्जीक हायनिटिसवर (नासिकास्तरावर सूज,संसर्ग,पाणी येणे इत्यादी) कायमचा उपाय नाही. शस्त्रक्रियासुद्धा नाही.

एलर्जीवर उपचार म्हणजे अँटी ऍलर्जीवर गोळ्या,2नाकात ड्रॉप्सही टाकतात. पण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.जास्त दिवस ड्रॉप्स वापरल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. या ड्रॉप्सपेक्षा स्टिरॉइड स्प्रे चांगला.त्याचे दुष्परिणाम कमी आहेत. गोळी स्वरूपात स्टिरॉइड्स घ्यायला नको.ते डॉक्टरांनीच दिले, तर त्यांच्याच सल्ल्याने तेवढेच दिवस व तेवढ्याच प्रमाणात घ्यावे.

हा लेख डॉ. देवेंद्र माहोरे नाक-कान-घसा तज्ञ यांचा असून, आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनचे श्री सावंत सर यांचेकडून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top