अखिल भारतीय काँग्रेस पक्षातर्फे पलूसचे आमदार डॉ.विश्वजीत कदम यांची,कर्नाटक राज्यातील आगामी लोकसभेच्या निवडणुकीतील उमेदवार ठरवण्याच्या स्क्रीनिंग कमिटीवर निवड.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

अखिल भारतीय काँग्रेस पक्षातर्फे पलूस कडेगावचे आमदार डॉ.विश्वजीत पतंगराव कदम यांची,कर्नाटक राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याच्या स्क्रीनिंग कमिटीवर निवड झाली असून,आज याबाबतची महत्त्वाची बैठक बंगळूर मध्ये पार पडली.अखिल भारतीय काँग्रेस पक्षातर्फे कर्नाटक राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याबाबतीत जी स्क्रीनिंग कमिटी नेमली आहे,त्यामध्ये पलूस कडेगाव चे आमदार डॉ.विश्वजीत पतंगराव कदम यांची नियुक्ती होणे ही,राज्याच्या दृष्टीने फार मोठी राजकीय महत्त्वाची घटना समजली जात आहे. 

कर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या बंगळूर मध्ये आज, कर्नाटक राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्यासाठी स्क्रीनिंग कमिटीची बैठक झाली असून, बैठकीस कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याजी,राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमारजी,स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष हरीश चौधरी यांचे सह सदस्य जिग्नेश मेवाणी व अनेक वरिष्ठ काँग्रेस नेते उपस्थित होते.आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी कर्नाटक राज्यातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार ठरवण्याबाबतीत,बरीच चर्चा या स्क्रीनिंग कमिटीच्यामध्ये झाली आहे.एकंदरीत आगामी लोकसभा निवडणुकीत, कर्नाटक राज्यात कोणा कोणाला उमेदवारी लोकसभेसाठी मिळेल? हे पाहणे पुढील राजकीय दृष्ट्या व सत्तेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top