शरीरातील महत्त्वाचे घटक असलेले हृदय व किडनी तंदुरुस्त ठेवण्यासाठी,काही महत्त्वाची उपयुक्त माहिती.!--

0

 आरोग्य भाग- 23

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

◾हृदय व किडनीच्या कार्यासंदर्भात महत्त्वाची माहिती.!-

तुमचं हृदय आणि किडनी यांचाही एकमेकांशी संबंध असतो. जर हृदयाचं आरोग्य बिघडलं,तर त्याचा परिणाम किडनीवर होतो आणि जर किडनीचं आरोग्य बिघडलं,तर त्याचा परिणाम हृदयावर होतो.हृदय आणि किडनी यांचं मुख्य काम रक्त शुद्ध करणं आणि ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करणं हे असतं, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.म्हणजे,शरीराचं कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी हृदय आणि किडनी महत्त्वाची भूमिका निभावतात. 

हृदय आणि किडनीचं मुख्य कार्य रक्त शुद्ध करण्याचं आहे. हृदयाच्या कार्यात अडथळा आला,तर त्याचा परिणाम किडनीच्या कार्यावर होतो.आणि जर किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण झाला,तर त्याचा परिणाम हृदयावर होतो. परिणामी शरीराचं कार्यही बिघडतं.त्यामुळे शरीरातील या दोन महत्त्वाच्या अवयवांचं आरोग्य उत्तम राखणं अत्यंत आवश्यक आहे.जाणून घेऊयात हृदय आणि किडनी यांचा एकमेकांशी संबंध काय यासंदर्भात सविस्तर... 

हृदयाचं काम संपूर्ण शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवठा करणं आणि किडनीचं काम रक्त शुद्ध करणं हे आहे.किडनी आपल्या संपूर्ण शरीरातील रक्त शुद्ध करतं,रक्तातील अशुद्ध, अपायकारक घटक किडनी रक्तातून काढून टाकते.जर किडनी व्यवस्थित काम करत नसेल,तर रक्तातील अपायकारक पदार्थ वेगळे होऊ शकणार नाही.आणि अशुद्ध रक्ताचा पुरवठा संपूर्ण शरीराला होईल,याचा परिणाम हृदयावर होईल.तसेच,जर हृदय नीट काम करत नसेल तर किडनीला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा होणार नाही.याशिवाय हृदयाचं आरोग्य बिघडलं तर शरीराला नीट रक्तपुरवठा होत नाही.त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.यामुळे गंभीर आजार जडू शकतात.म्हणूनच दोन्ही अवयवांचं आरोग्य राखणं अत्यंत आवश्यक आहे. 

आपलं हृदय आणि किडनी तंदूरूस्त ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे.तसेच,तेलकट,तूपकट, मसालेदार पदार्थांचं अतिसेवन टाळा.तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा.अन्यथा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.शरीराच्या उंचीनुसार वजन संतुलित राखण्याचा प्रयत्न करा.वाढलेल्या वजामुळेही शरीराच्या अनेक समस्या उद्भवतात.याचा परिणामही किडनी आणि हृदयावर होतो.वाढत्या वयासोबत फॅटयुक्त आहार खाण्यावर कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे.धुम्रपान शरीरासाठी हानिकारक आहे.धुम्रपानाचा परिणाम हृदयावर होतो.यामुळे तुमचं हृदय कमजोर होऊन किडनीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.त्यामुळे सिगरेट पिणं टाळा.वरील सर्व समस्यांचा सामना करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा.यामुळे ह्रदय आणि किडनी दीर्घकाळ तंदूरूस्त राहण्यास मदत मिळते.

ह्या लेखाचे शब्दांकन प्रमोद पाठक यांचे असून,सोशल समर्थ फौंडेशनच्या माध्यमातून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top