सांगली महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आणि हळदीकुंकू समारंभ संपन्न.!--

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा सौ.रोहिणीताई खडसे,राष्ट्रवादी चे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहरजिल्हाध्यक्षा सौ.संगीताताई हारगे यांच्या संकल्पनेतून व  राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाच्या सांगली शहर जिल्हा अध्यक्षा मा.सौ.संगीता जाधव यांच्या माध्यमातून,आज साई मंगल कार्यालय वारणाली रोड,सांगली येथे महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. 

यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिका राष्ट्रवादी असंघटित कामगार संघटनेच्या शहरजिल्हाध्यक्षा संगीता जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व महिला पदाधिकारी लीना यादव यांनी सूत्रसंचालन केले.टेंडल्या चित्रपट फेम कलाकार सौ.मोहिनी खोत यांची या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती होती.

तसेच सौ.उज्वला खांडेकर व सौ.प्रमिला साळुंखे यांनी आज  मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी महिला काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी महिला शहरजिल्हाध्यक्ष सौ संगीता हारगे यांनी त्यांचे स्वागत करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच गुणवंत खेळाडू म्हणून कु.पूजा चौगुले यांचा ही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.सदर महिला मेळाव्यामध्ये महिलांसाठी गायन,नृत्य व पारंपारिक खेळ अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी राष्ट्रवादी महिला शहरजिल्हाध्यक्षा सौ संगीताताई हारगे म्हणाल्या की राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने महिलांच्या साठी विविध उपक्रम नेहमीच राबविण्यात येत असतात.महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेत असतो.त्यामुळे आपल्या भागातील महिलांच्या कोणत्याही समस्या असतील तर आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत असा विश्वास ही त्यांनी यावेळी दिला.या भागातील मा.नगरसेवक विष्णू माने यांनीही या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना ते म्हणाले की,भागातील  जास्तीत जास्त नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न असतो.आपल्या भागातील महिलां भागिनींचे काहीही प्रश्न असतील तर मला हक्काने सांगावेत तसेच प्रभागात महिला राष्ट्रवादी वाढीसाठी सदैव मदत करणार असल्याचे आश्वासन ही त्यांनी यावेळी दिले.

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.नगरसेवक विष्णू माने, राष्ट्रवादी शहरजिल्हाध्यक्षा संगीताताई हारगे, महिला प्रदेश संघटक सचिव ज्योती अदाटे,शहर जिल्हा उपाध्यक्ष सौ पवित्राताई केरीपाळे,प्रमुख सचिव डॉ शुभम जाधव,महिला शहरजिल्हा उपाध्यक्षा संगीता जाधव व स्नेहा सुतार,मा.नगरसेविका विद्या कांबळे,वंदना चंदनशिवे,वैशाली धुमाळ,प्रियांका तुपलोंढे,स्वाती शिरूर, छाया पांढरे,शीतल सोनवणे,नर्मदा साळुंखे,सुनीता जगधने यांच्या सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top