शरीरास वेगवेगळ्या ऋतूमध्ये येणाऱ्या ताप या रोगासाठी,औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या "पॅरासिटॅमॉल" विषयी अत्यंत उपयुक्त माहिती.!--

0

 आरोग्य भाग- 35.

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

औषधांच्या दुकानात जाऊन बर्‍याचदा तुम्ही तापासाठीच्या गोळ्या आणल्या असतील.क्रोसिन,मेटॅसीन,पॅमाॅल अशा विविध नावांनी विकल्या जाणाऱ्या या गोळ्यांमध्ये 'पॅरॅसिटॅमॉल' नावाचे एक औषध असते हे तुम्हाला ठाऊक आहे काय ?

पॅरासिटेमॉल हे औषध गोळ्यांच्या तसेच पातळ औषधाच्या स्वरूपात मिळते.या औषधामुळे ताप कमी होतो.मेंदूतील तापमानाचे संतुलन करणाऱ्या केंद्रावर या औषधामुळे परिणाम होतो व ताप कमी होतो.साहजिकच कोणत्याही तापासाठी पॅरासिटामॉल हे औषध घेतल्यास ताप कमी होतो.पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की,ताप हा रोग नाही तर ते केवळ रोगाचे लक्षण आहे.ताप ज्या रोगामुळे होतो तो रोग बरा केल्याखेरीज ताप कायमचा बरा होणार नाही.ताप केव्हा येतो, किती वेळ राहतो,जास्त असतो वा कमी,यावर रोगांचे (जसे हिवताप, क्षयरोग) निदान अवलंबून असते.त्यामुळे ताप आल्या आल्या पॅरासिटेमॉलच्या गोळ्या घेतल्याने निदानात अडचण येऊ शकते. 

ताप आल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज औषध घेऊ नये. कोणतेही औषध दुष्परिणामरहित नसते.त्यामुळे आवश्यकता असल्यासच औषध घ्यावे.खरे तर अंग थंड पाण्याने पुसणे, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे या घरगुती उपायांनीही ताप उतरतो.प्रसंगी या उपायांचा वापर करावा.

सर्दी,खोकला अशा सामान्य रोगात येणाऱ्या तापासाठी हे औषध घ्यायला हरकत नाही.ताप उतरण्याखेरीज हे औषध वेदनाशमनही करते व सूजही उतरवते.

हा लेख डॉ.जगन्नाथ दीक्षित व डाॅ.अंजली दीक्षित यांचा असून, आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनचे श्री.सावंत सर यांचे कडून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top