कोल्हापुरातील संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची त्वरित ‘सी.आय.डी.’ चौकशी व्हावी,तसेच सरकारीकरणाच्या विरोधात 27 फेब्रुवारीला भव्य मोर्चा.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

कोल्हापूरातील व देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानात प्रशासक नेमल्यावरही,भाविकांच्या असुविधांमध्ये वाढच झाली आहे. प्रशासक येण्यापूर्वी देवस्थानातील जे विश्‍वस्त दोषी आहेत त्यांच्यावर अद्याप कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही.या संदर्भात ‘सी.आय.डी.’ चौकशी व्हावी अन् मंदिर भक्तांच्या ताब्यात द्यावे,या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी,तसेच महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन होऊनही त्यावर कार्यवाही झालेली नाही.भक्तांची मागणी असूनही सी.आय.डी.चौकशी होण्यामागे दिरंगाई का?तरी संत बाळूमामा देवस्थानाच्या देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणांची त्वरित ‘सी.आय.डी.’ चौकशी व्हावी,तसेच सरकारीकरण न करता मंदिर भक्तांच्या ताब्यात द्यावे,या तसेच अन्य मागण्यांसाठी ‘बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था', हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने बाळूमामांच्या भक्तांचा 27 फेब्रुवारी या दिवशी ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.हा मोर्चा सकाळी 11 वाजता दसरा चौक येथून प्रारंभ होऊन व्हिनस चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त होईल.मोर्चाच्या अंती मान्यवरांचे मार्गदर्शन होईल,अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री.सुनील घनवट यांनी दिली आहे.

मोर्चाच्या नियोजनासाठी,तसेच पाठिंब्यासाठी ठिकठिकाणी बैठका,सामाजिक माध्यमांद्वारे प्रसार करण्यात येत आहे.या मोर्चाच्या नियोजनासाठी,तसेच पाठिंब्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी हिंदुत्वनिष्ठांच्या बैठका होत आहेत. कोल्हापूर येथील शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिर येथे झालेल्या बैठकीत सर्वच हिंदुत्वनिष्ठांनी मोर्चाला पाठिंबा देत मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री.दीपक देसाई,भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री.आनंदराव पवळ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री.उदय भोसले,उद्धव ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख श्री.शशी बिडकर, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.आप्पासाहेब बन्ननेवार,शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री.सुनील सामंत,अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री.संदीप सासने,महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री प्रमोद सावंत,धर्मप्रेमी श्री.रामभाऊ मेथे,हिंदु जनजागृती समितीचे श्री.शिवानंद स्वामी,कु.प्रतिभा तावरे उपस्थित होत्या. 

या मोर्चाच्या प्रसारासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी संत बाळूमामा यांचे भक्त,विविध देवस्थांचे प्रमुख-विश्‍वस्त, विविध मंडळ यांच्या भेटी चालू आहेत.सर्वांनी 'एक दिवस बाळूमामांसाठी’असा निर्धार व्यक्त  करून कोणत्याही परिस्थितीत बाळूमामा देवस्थान हे भक्तांच्या ताब्यातच राहिले पाहिजे,यांसाठी मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले. या संदर्भात फेसबुक, व्हॉटस अ‍ॅप अशा सामाजिक माध्यमांद्वारेही मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top