लहान मुलांच्या शारीरिक आरोग्याच्या उंचीसह सर्वच बाबतीत लाभ होण्यासाठी,उपयुक्त असलेल्या 4 योगासनांची सुंदर माहिती.!--

0

 आरोग्य भाग- 36.

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

योगा शरीराच्या बाहेरील नाही तर आतील आरोग्यासाठी महत्वाचा असतो.मुलं कितीही खातात तरी अंगाला लागत नाही.बारीक दिसतात त्यांची उंची वाढत नाही अशी अनेकांची तक्रार असते. (Parenting Tips) शरीराला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता.ही योगासनं करून तुम्ही मुलांची उंची वाढवण्यासाठी मदत करण्यात मदत करू शकता.

मुलांची उंची कमी असेल आणि तुम्हाला मोठे झाल्यानंतरही त्यांची उंची कमी राहील अशी भिती असेल तर काही योगासनांची मदत घेऊन तुम्ही हाईट वाढवू शकता...

1) चक्रासन...

उंची वाढवण्यासाठी रोज चक्रासन करण्याचा सल्ला दिला जातो. चक्रासन करण्यासाठी तुम्हाला जमीनीवर पाठीवर झोपावे लागेल.त्यानंतर पाय गुडघ्यात मोडून आणि हात कानांजवळ घेऊन मोडा.त्यानंतर हात आणि पायांच्या मदतीने शरीर जमीनीपासून वरच्या बाजूने उचला.हे शरीराच्या चक्राप्रमाणे दिसेल.चक्रसान केल्याने हाईट तर वाढतेच पण शरीराची लवचीकतासुद्धा वाढते.

2) ताडासन...

मुलांसाठी ताडासन करणं  प्रभावी मानलं जातं.ताडासन करण्यासाठी जमिनीवर सरळ उभं राहा.त्यानंतर दोन्ही पायाचे पंजे आणि टाचा चिटकवून उभं राहा.त्यानंतर हात एकत्र जोडून शरीर वरच्या बाजूला खेचा.५ ते ८ वेळा दीर्घ श्वास घ्या. नंतर सामान्य स्थितीत या. 

3) पश्चिमोत्तासन...

पश्चिमोत्तासन करण्यासाठी जमीनिवर दोन्ही पाय समोर पसरवून बसा.गुडघे हलके वरच्या बाजूला उचला.त्यानंतर पाठ सरळ करत समोर आणा हात सरळ करत पायांच्या पंज्यांना स्पर्श करा.दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या.काहीवेळासाठी या स्थितीत होल्ड करून सामान्य स्थितीत या.रोज हे योगासन केल्यानं शरीर व्यवस्थित स्ट्रेच होते. 

4) धनुरासन...

या आसनाला बो पोज असंही म्हणतात.कारण यात शरीर धनुष्याप्रमाणे दिसते.धनुरासन करण्यासाठी पोटावर झोपा. त्यानंतर पाय आणि हात वर उचला.काही वेळ या स्थितीत राहा त्यांतर सोडून द्या.धनुरासन  केल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात,आणि पचनक्रियाही चांगली राहते.  शरीराची फ्लेक्सिबिलिटी वाढून उंची वाढण्यासही मदत होते.

ह्या लेखाचे शब्दांकन डॉ.सुनील इनामदार यांचे असून,संतोष सावंत सर,आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top