देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही.नरसिंहराव,चौधरी चरणसिंह व प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी "भारतरत्न" सन्मान जाहीर.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

वृत्त-सोशल मीडिया

देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव चौधरी,चौधरी चरणसिंह व प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ डॉ.एम.एस. स्वामीनाथन यांना मरणोत्तर,भारताचा सर्वोच्च नागरी "भारतरत्न" पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रसार माध्यमांना दिली आहे.देशात 2014 पासून नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत जवळजवळ 10 जणांना "भारतरत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.यापूर्वी 1999 मध्ये जयप्रकाश नारायण,2015 मध्ये पं.मदन मोहन मालवीय व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, 2019 मध्ये प्रणव मुखर्जी,भूपेन हजारिका व नानाजी देशमुख यांना "भारतरत्न" पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. 

तत्कालीन काँग्रेसच्या राजवटी पी.व्ही.नरसिंहराव हे पंतप्रधान होते व 1979 मध्ये चौधरी चरण सिंह यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले होते.देशातील कृषी क्षेत्रातील क्रांती घडवणाऱ्या हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉ.एम.एस.स्वामीनाथन हे देशाला परिचित आहेत. दरम्यान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा सरकारचा निर्णय आनंददायी असून,आमचे मन जिंकले आहे असे प्रतिपादन चौधरी चरण सिंहांचे नातू व राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी यांनी म्हटले आहे. 

देशातील कृषी क्षेत्रातील हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखणाऱ्या डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांचे कार्य अजरामर असून,त्यांना आजपर्यंत रॅमन मॅगसेस सह अनेक जागतिक पुरस्कार मिळाले आहेत.गेल्या सप्टेंबर महिन्यात कृषी शास्त्रज्ञ डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले होते.तत्कालीन देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचा जन्म आंध्र प्रदेशात 1921 साली झाला असून,डिसेंबर 2004 मध्ये त्यांचे निधन झाले आहे.

 आजच्या जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्काराच्या घोषणेचे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी,काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्व विरोधी पक्षीयांनी स्वागत केले आहे.माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्या कन्या आमदार वाणी देवी यांनी,नरसिंहराव यांना "भारतरत्न" पुरस्कार दिल्याबद्दल,कृतज्ञता व्यक्त करून आनंद व्यक्त केला आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top