मराठा समाजाचे आंदोलन कर्ते मनोज जरांगे- पाटील यांचे अखेर आमरण उपोषण मागे;मराठा आरक्षण "सगेसोयरे"च्या अंमलबजावणीसाठी साखळी उपोषण ठेवणार.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

मराठा समाजाचे आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज अखेर आपले आमरण उपोषण मागे घेऊन,मराठा आरक्षणाच्या सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी साखळी उपोषण चालू राहणार असल्याचे सांगितले आहे.सध्या छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्याने,राज्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.मराठा समाजाचे आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांचे 16 दिवशी सुरू असलेले आमरण उपोषण अखेर मागे घेतले जाऊन,सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी,यापुढे साखळी उपोषण चालू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 दरम्यान मराठवाड्यात काही ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून,अंबड तालुक्यात जमाबंदीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत.मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक घटना घडल्याचे वृत्त आहे.मराठा बांधवांच्या विनंतीनुसार मी माझे चालू असलेले बेमुदत उपोषण स्थगित करत असून,यापुढे साखळी उपोषण सुरू असून, रुग्णालयातील 1-2 दिवसाचा उपचार घेतल्यानंतर,परत मराठा बांधवांच्या भेटीगाठी सुरू करून,मराठा समाजाच्या आरक्षणासाठी,शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्यात येईल असे मराठा समाजाचे आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ कार्यालयात एक महत्त्वाची बैठक घेऊन,राज्यातील आमदारांना मराठा समाजाचे आंदोलन संयमाने हाताळण्याच्या सूचना करत, आपण मराठा समाजासोबत असल्याचा संदेश पोहोचवण्याचे आवाहन केलेले असून,मराठा समाजास दिलेले आरक्षण टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे समाजापर्यंत पोहोचवा असे सांगितले आहे. एकंदरी मराठा समाजाचे आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केल्याने,महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तापलेले वातावरण निवळण्यास मदत होईल असे चित्र आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top