केंद्रशासित चंदीगड प्रदेशाचे प्रशासक व पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा,दोन्ही पदांचा,वैयक्तिक कारणामुळे राजीनामा.--

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

वृत्त-सोशल मीडिया

केंद्रशासित चंदीगड प्रदेशाचे प्रशासक व पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आज वैयक्तिक कारणामुळे दोन्हीही पदांचा राजीनामा दिला आहे.आज देशाचे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना,त्यांनी राजीनामा देत असल्याचे पत्र पाठवले आहे. 

पंजाबचे राज्यपाल म्हणून बनवारीलाल पुरोहित यांनी ऑगस्ट 2021 मध्ये पदभार स्वीकारला होता व त्याबरोबरच तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून ते सन 2017 ते 2021 सालापर्यंत  कार्यरत होते.2016 ते 2017 पर्यंत ते आसामचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. 

महाराष्ट्र राज्यातील नागपूरचे ते 3 वेळा पूर्वी खासदार म्हणून निवडून आले होते.त्यानंतर त्यांनी पुढील काळात, राज्यपालपदांचा कार्यभार स्वीकारला होता.केंद्रशासित चंदिगड प्रदेशाचे प्रशासक म्हणून व पंजाबचे राज्यपाल म्हणून असलेल्या दोन्हीही पदांचा,स्वतःच्या वैयक्तिक कारणामुळे आज त्यांनी राजीनामा दिला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top