महाराष्ट्र राज्यात खेळाडूंना उत्कृष्ट प्रशिक्षक,क्रीडांगणे,क्रीडा संकुल सुविधांसाठी राज्य सरकारकडून भरीव मदत.--राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार.!---

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

महाराष्ट्र राज्यात खेळाडूंना प्रशस्त क्रीडांगणे,उत्कृष्ट प्रशिक्षक व क्रीडा संकुल सुविधांसाठी,राज्य सरकार भरीव मदत करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली येथे केले आहे.सांगली,मिरज कुपवाड शहर महानगरपालिका व न्यू उत्कर्ष क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या विद्यमान्वये आयोजित केलेल्या,71 व्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) 2023-2024 स्पर्धेस,आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. 

महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना बक्षीसे देण्यासाठी,भरपुर आर्थिक तरतूद करीत असून, राज्यात प्रशस्त क्रीडांगणे,उत्कृष्ट प्रशिक्षण व क्रीडा संकुलांच्या सुविधांसाठी,राज्य शासनाकडून भरपूर मदत होत असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.आज झालेल्या 71 व्या जिल्हा अजिंक्य पद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेवेळी क्रीडा संघटक नितीन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला असून,महिलांमधील पहिल्या तीन आलेल्या संघांना, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते चषक देऊन गौरवण्यात आले.

आजच्या झालेल्या समारंभास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे,क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे,आमदार सुधीरदादा गाडगीळ,महापालिका आयुक्त सुनील पवार,उपायुक्त राहून रोकडे,वैभव साबळे, माजी आमदार दिनकर पाटील,पद्माकर जगदाळे यांच्यासह जिल्ह्यातील कबड्डी खेळाडू,कबड्डी रसिक नागरिक व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top