महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना अनेक सुविधांचा लाभ मिळण्यासाठी,गुगल बरोबर सामंजस्य करार केला.!-- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

महाराष्ट्र राज्य सरकारने,राज्यातील नागरिकांना अनेक सुविधांचा लाभ मिळण्यासाठी,गुगल बरोबर सामंजस्य करार केला असल्याची माहिती,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसार माध्यमांना दिली.महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना शेती,आरोग्य,स्टार्ट अप,कौशल्य विकास आदी क्षेत्रात सुविधांचा लाभ होण्यासाठी व त्यासाठी ॲप तयार करणेसाठी,गुगल बरोबर सामंजस्य करार केला आहे. 

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना शेती संबंधी सर्व माहिती उपलब्ध होण्यासाठी,सदरहू शेती ॲपची निर्मिती केली जाणार असून,इतर विविध क्षेत्रातही संबंधित ॲप तयार करून,विविध क्षेत्रांचा विकास साधण्यासाठी उपयोग केला जाणार आहे.महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना देखील शेतीच्या पेरणी संबंधी,जमिनीच्या कसा संबंधी,हवामान विषयक आदी सर्व बाजूंची माहिती या ॲपद्वारे शेतकऱ्यांना मिळेल.महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना विविध क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी,महाराष्ट्र राज्य सरकारने गुगल बरोबर केलेल्या सामंजस्य कराराचा फायदा होईल हे मात्र निश्चित आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top