देशातील राजधानी दिल्लीकडे कूच करणाऱ्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांकडून शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधूर,रबरी गोळ्या,पाण्याच्या फवाऱ्याचा वापर.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

वृत्त: सोशल मीडिया

देशातील राजधानी असलेल्या दिल्लीतील शंभू सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून रबरी गोळ्या,अश्रुधुर व पाण्याच्या फवाऱ्याचा वापर करण्यात आला आहे.देशातील शेतमालाला किमान आधारभूत किमती देण्याचा कायदा करावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी,पंजाब,हरियाणा व उत्तर प्रदेशातील शेतकरी,शंभू सीमेवर आंदोलन करीत दिल्लीकडे कुच करीत आहेत. 

दरम्यान शेतकरी संघटनेचे नेते जगजीत डल्लेवाल यांची प्रकृती खालावत असून,केंद्र सरकारने पण आंदोलन चिघळत जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांना, पुन्हा एकदा चर्चेचे निमंत्रण दिले आहे.

आज शेतकरी आंदोलनाचा 10 दिवस आहे.केंद्र सरकारने यापूर्वी शेतकरी संघटनेच्या नेत्यांबरोबर 4  बैठका झाल्या असून,शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र होत असल्याने केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी,शेतकऱ्यांच्या नेत्यांना पुन्हा चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.त्यामुळे केंद्र सरकार तर्फे नवा एखादा प्रस्ताव शेतकरी संघटनेच्या नेत्यांसमोर ठेवला जाणार की काय? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर,पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान व हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल कट्टर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या दिल्लीतील शंभू सेनेवर चालू असलेल्या आंदोलनाला,पुढील दिशा कशी मिळते? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top