सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने,आशा सेविका,गटप्रवर्तक,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिला विरोधी सरकारचे निषेध आंदोलन.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

आशा सेविका,गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या या महिला विरोधी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज आशा सेविका,गट प्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या प्रश्ना बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले.

आरोग्य हा अत्यंत महत्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ,समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता,सुसंवाद,समन्वय,प्रोत्साहन, वाटाघाटी निर्माण करण्याच्या दृष्टीने “आशा स्वयंसेविका” महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आशा स्वयंसेविका चा उपयोग होतो. ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये आशा मध्यस्थीचे काम करतात.ग्रामिण भागात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महत्वपूर्ण भुमिका बजावणाऱ्या आशा सेविकांना शासनाकडून तुटपुंजे मानधन मिळते.आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी राज्यभरातील आशा सेविका,गट प्रवर्तक संपावर आहेत.तरी सरकारने दिलेले आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावे,अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षा सौ.संगीता हारगे,नगरसेविका पवित्रा केरीपाळे,छाया जाधव,शारदा माळी,वंदना चंदनशिवे,स्नेहा सुतार,अनिता पांगम,संगीता जाधव,रईसा चिंचणीकर,वैशाली धुमाळ,स्वाती शिरूर,संगीता हेगडे,शीतल सोनवणे,दीपाली पवार,अरुणा कांबळे,मंजुश्री कुंभार,राधिका कुंभार,सरोजा दळवी,माधुरी कुलकर्णी,नीता म्हेत्रे,वत्सला बनसोडे,निशा गवळे,अश्विनी कुंभार आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top