वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीस,सुमारे 10325 रुपये प्रतिक्विंटल दरापर्यंत सोनेरी वाढ व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरामध्ये सुद्धा चांगली वाढ.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तूरीस सुमारे 10,325 रुपये प्रतिक्विंटल असा घसघशीत दर मिळाला असून,ही एक तुरीच्या दरामध्ये सोनेरी वाढ असल्याचे दिसून येत आहे.

आजच्या परिस्थितीत सोयाबीनला दरवाढ नसल्यामुळे,तुरीला तरी या चालू हंगामात,वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये,10,325 रुपये इतकी घसघशीत दरवाढ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 सध्या राज्यातील बाजार समितीमध्ये,सोयाबीन, तूर, हरभरा, गहू आदि शेतमाल शेतकऱ्यांकडून विक्रीस येत आहे. सांगलीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हळदीच्या सौद्यामध्ये सुद्धा,चांगल्या प्रतीच्या हळदीस रुपये 27000/- पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

 महाराष्ट्र राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या काही शेतमालास चांगला दर मिळत असल्याचे दिसून येत आहे,त्यामुळे शेतकरी वर्गात उत्साहजनक वातावरण दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top