सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातील 24 गावांचा निवडणुकावर बहिष्कार व कर्नाटकला जोडण्याची मागणी,निंबोणीतील पाणी परिषदेत ठराव.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

 सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी 24 गावांनी पाटकळ येथे बैठक घेऊन इशारा दिल्यानंतर,सरकारने याची दखल न घेतल्याने,येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकावा व महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यावर अन्याय करत असल्याने,लवकरच 24 गावचे शिस्टमंडळ मुख्यमंत्र्याना भेटून कर्नाटक मध्ये 24 गावे सामील करून घेण्याची मागणी करुन, कर्नाटकला जोडण्याच्या मागणी संबंधी 24 गावच्या निंबोणी येथील बैठकीत एकमताने ठराव करण्यात आला.

 मंगळवेढातील दुष्काळी 24 गाव पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी वरील दोन्ही ठराव मांडून,2009 ला लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार व त्यातून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा मार्गी  लागलेला विषय,15 वर्षे सगळ्या पक्षाची सरकारे येऊन ही आमची योजना मार्गी लागली नसल्यामुळे,शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे.मंगळवेढा तालुक्यात भीषण टंचाई असतानाही,दुष्काळात मंगळवेढा तालुका बसला नसल्यामुळे,सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची कॅबिनेट पुढे मंजुरी व निधीची तरतूद नाही केली तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच आचारसंहिता जाहीर होईल त्याच दिवशी 24 गावे जोडून घ्यावीत यासाठी लवकरच 24 गावाचे शिष्ट मंडळ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या भेटीचे नियोजन करण्याचा ठरावही एकमताने करण्यात आला.

 बैठकीस मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले भुयार मठाचे मठाधिपती ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज यांनी जत मधील 65 गावाचे आंदोलन यशस्वी करून त्या गावांना मोठ्या प्रमाणावर  न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला असल्याचे सांगितले.24 गावातील ग्रामस्थांनीही आपापसातील मतभेद विसरून व राजकारण विरहित ही चळवळ पुढे घेऊन जाऊ जावे.यासाठी लागेल ती मदत मी करणार असल्याचेही तुकाराम महाराजांनी सांगितले. 

 बैठकीत बोलताना भाळवणी चे माजी उपसरपंच पांडुरंग चौगुले यांना 2009 मध्ये टाकलेला बहिष्कार आंदोलनामुळे 20 गावची मंगळवेढा उपसा सिंचन योजना तयार झाली. दुष्काळी 24 गावांना 2 टीएमसी पाणी उपलब्ध झाले आणि योजना अंतिम टप्प्यात आली.हे सर्व केवळ विविध आंदोलने व बहिष्कार यामुळे झाले. 

 प्रास्ताविक करताना निंबोणीचे सरपंच बिरुदेव घोगरे म्हणाले की,मंगळवेढ्याच्या दुष्काळी 24 गावात पाण्याची भीषण टंचाई आहे.येथील शेतकऱ्यांनी जगायचे कसे.? असा सवाल केला. दुष्काळाची येथे भीषण परिस्थिती असतानाही मंगळवेढा तालुका दुष्काळ यादीत बसला नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याचेही सांगितले.तर पाणी संघर्ष समितीचे ऍड भारत पवार यांनी आंदोलनाशिवाय 24 गावांना न्याय मिळणार नसून,राजकारणी विरहीत ही चळवळ पुढे घेऊन जावी.नक्की योजना मार्गी लागेल असे सांगितले.आपला बहिष्कार आणि कर्नाटकात जायचं निर्णय अत्यंत योग्य असून,यामुळे सरकारला याची दखलच घ्यावी लागेल असे सांगितले.यावेळी लेंडवे चिंचाळ्याचे सरपंच गुंडा लेंडवे,रड्ड्याचे ऍड रवी कोळेकर,खुपसंगीचे माजी सरपंच शहाजहान पटेल,खडकीचे नानासाहेब कटारे,खवेचे संग्राम दुधाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत,सजग नागरिक संघाचे अध्यक्ष संजय कट्टे,खडकी चे सरपंच संजय राजपूत,उपसरपंच अशोक जाधव,हाजापुरचे माधवानंद आकळे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे,जित्तीचे माजी सरपंच शिवाजी सावंत,विष्णू मासाळ,चंद्रकांत गरंडे, येड्रावचे दौलत माने,रमेश पाटील,खुपसंगीचे ग्रा.प.सदस्य रामचंद्र तांबे,भाळवणी माजी सरपंच ज्ञानेश्वर भंडगे,  अशोक माने,महेश पाटील,सलीम शेख,चंद्रकांत ढगे, तुळशीदास मुठेकर,हिरालाल शेख,येसप्पा ढगे,नामदेव म्हारनूर आदी सह 24 गावातील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे निटनेटके नियोजन निंबोणी ग्रामस्थांनी केलेले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबोणीचे ग्रा.प.सदस्य विनायक माळी यांनी केले तर आभार ऍड दत्तात्रय खडतरे यांनी मांनले.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातील 24 गावांचा निवडणुकावर बहिष्कार व कर्नाटकला जोडण्याची मागणी,निंबोणीतील पाणी परिषदेत ठराव.!--

बैठकीत घेण्यात आलेले ठराव पुढीलप्रमाणे...

 बैठकीत मंगळवेढ्यातील दुष्काळी 24 गाव पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक अंकुश पडवळे यांनी खालील 2 ठराव मांडले व सर्वांनी हात वर करून त्याला एकमताने पाठिंबा दिला.

1. मंगळवेढा उपसा सिंचन योजना येत्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापुढे मंजूर करून,त्याला निधी मंजूर करावा अन्यथा येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक बहिष्कार टाकणे. सदर ठरावाला सर्व शेतकरी व महिला शेतकरी ने हात उंच करून पाठिंबा दिला.

2. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जर राज्य सरकारने सदर योजना मार्गी लावली नाही तर,राज्य सरकारने 64 वर्षात येथील शेतकऱ्यांच्या मूलभूत पाणी प्रश्न बाबत न्याय न दिल्याने,मंगळवेढ्याची २४ गावे कर्नाटकला जोडावी असा ठराव एकमताने करण्यात आला.व 2 दिवसात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची वेळ घेऊन शिष्टमंडळ भेटीला जाण्याचे ठरले.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top