मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयांमध्ये नुकतेच प्रवेश केलेले बामसे प्रणित बहुजन मुक्ती पार्टी,ट्रेड युनियन,विद्यार्थी मोर्चा,भारत मुक्ती मोर्चाच्या 40 पदाधिकाऱ्यांचे सांगलीमध्ये जोरदार स्वागत.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज यांच्या हस्ते,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालय मुंबई या ठिकाणी नुकतेच प्रवेश केलेल्या बामसेफ प्रणित बहुजन मुक्ती पार्टी,ट्रेड युनियन,विद्यार्थी मोर्चा, भारत मुक्ती मोर्चाच्या प्रमुख 40 पदाधिकाऱ्यांचे,सांगलीमध्ये पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार जयंतरावजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थित, मुंबई येथील प्रदेश कार्यालयात बहुजन मुक्ती पार्टीचे माजी राष्ट्रीय महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ-पाटील आणि बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कामगार नेते संतोष भाई घरत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील सर्वच प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.

पुरोगामी महाराष्ट्राची विचारसरणी जपण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचा नेहमीच मोलाचा वाटा राहिला आहे.याच विचारांचे अनुयायी असलेल्या बामसेफ प्रणित बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश करून, येणाऱ्या काळात सांगलीमध्ये श्री.संजयजी बजाज यांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी ताकदीने काम करु अशी ग्वाही दिली.

यावेळी बामसेफ प्रणित राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्याचे माजी कार्यकारी अध्यक्ष तसेच सांगली जिल्ह्याचे बामसेफचे माजी अध्यक्ष श्री.शितल विठ्ठल खाडे,राष्ट्रीय लिंगायत मोर्चाचे स्थानिक कार्यकर्ते,भारतीय विद्यार्थी मोर्चाचे पदाधिकारी,भारती युवा मोर्चाचे पदाधिकारी तसेच सांगलीमधील श्रावण साबळे,संतोष हेगडे,नवनाथ भालेकर,अनिल कोरे,एन.पी.कोरे,आनंदराव ऐवळे,आकाश साळुंखे,सुर्यकांत खाडे,विशाल खाडे,संतोष कांबळे,आकाश जाधव,ओंकार भंडारी,कैफ,प्रियेश,सारंग मोहिते आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी,नवीन प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना पक्षाची ध्येयधोरणाची तसेच माहिती अवगत करून दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज,मा.नगरसेवक हरिदास पाटील,सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे,अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष समीर कुपवाडे, सामाजिक न्याय विभागाचे युवक सांगली शहर अध्यक्ष गॅब्रियल तिवडे,रोहित आठवले आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top