अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून,देशाच्या लोकसभेच्या उमेदवारांची 46 जागांची चौथी यादी जाहीर केली असून,महाराष्ट्र राज्यातील 4 जागांचा त्यात समावेश.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

वृत्त-सोशल मीडिया.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने,देशातील लोकसभेच्या 46 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली असून,त्यात महाराष्ट्र राज्यातील 4 जागांचा समावेश आहे.महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली- चिमूर मधून नामदेव किरसान,रामटेक मधून रश्मी बर्वे,नागपूर मधून विकास ठाकरे,भंडारा- गोंदिया मधून डॉ.प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. 

महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीमध्ये सध्या,काही ठिकाणच्या लोकसभेच्या उमेदवारीच्या जागाबाबत तिढा कायम असून,त्यात विशेषत्वाने चंद्रपूर व सांगली लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 

आज अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या 46 लोकसभा उमेदवारांच्या चौथ्या यादीत,महाराष्ट्र राज्यातील विदर्भातील 4 जागांचा समावेश आहे.एकंदरीतच महाराष्ट्रातील यंदाची लोकसभेची लढत,एकास एक करण्याच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी कसोशीने प्रयत्न चालवले आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top