महाराष्ट्र राज्यात 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये 5 टप्प्यात मतदान होणार असून, राज्यात आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

महाराष्ट्र राज्य एकूण 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये 5 टप्प्यात मतदान होणार असून,संपूर्ण राज्यात आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.महाराष्ट्र राज्यात यंदाच्या वर्षी जवळपास 9 कोटी 12 लाख 44 हजार 679 मतदार लोकशाहीतील मतदानाचा हक्क बजावणार असून, राज्यात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी,मतदारांसाठी 97 हजार 325 मतदान केंद्रे असतील.

महाराष्ट्र राज्यातील 5 टप्प्यांमध्ये होणाऱ्या मतदारसंघात अनुक्रमे 19 एप्रिल च्या पहिल्या टप्प्यात रामटेक,नागपूर,भंडारा- गोंदिया,गडचिरोली- चिमूर,चंद्रपूर, 26 एप्रिलच्या दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा,अकोला,अमरावती,वर्धा,यवतमाळ- वाशिम, हिंगोली,नांदेड,परभणी;7 मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात रायगड,बारामती,धाराशिव,लातूर,सोलापूर,माढा, सांगली,सातारा,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,कोल्हापूर आणि हातकणंगले; 13 मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्या नंदुरबार, जळगाव,रावेर,जालना,छत्रपती संभाजीनगर,मावळ,पुणे, शिरूर,अहमदनगर,शिर्डी,बीड व अखेरच्या 20 मे च्या पाचव्या टप्प्यात धुळे,दिंडोरी,नाशिक,पालघर,भिवंडी, कल्याण,ठाणे,मुंबईतील 6 मतदारसंघ अशा एकूण 48 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 

भारतीय निवडणूक आयोगाचे झुंडशाही,पैशाचा गैरवापर, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती,फेक न्यूज,आचारसंहितेचा भंग आदी गोष्टींवर विशेष लक्ष असणार आहे.विशेष म्हणजे राज्यातील सांगली व कोल्हापूर येथील लोकसभा निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी होणार आहे.

 एकंदरीतच भारतीय निवडणूक आयोगाने काल जाहीर केलेल्या लोकसभा निवडणूक कार्यक्रमानुसार ,राज्यातील राजकीय वातावरण बदलास सुरुवात झाली असून, राज्यातील सर्वच ठिकाणी लोकसभा मतदारसंघातील लढती या रंगतदार असणार आहेत असे स्पष्टपणे दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top