आगामी लोकसभा निवडणूक ही देशाची पुढील 50 वर्षाचे भवितव्य ठरवणारी.-- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा.

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

आगामी लोकसभा निवडणूक ही देशाची पुढील 50 वर्षाची भवितव्य ठरवणारी असून,2047 पर्यंत भारत स्वयंपूर्ण, स्वावलंबी व पूर्ण आधुनिक विकसित असलेले राष्ट्र बनेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. मुंबईमध्ये इंडिया ग्लोबल फाउंडेशन मार्फत आयोजन करण्यात आलेल्या वार्षिक गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते.

मागील आपल्या सरकारचा 10 वर्षातील केलेल्या विकासाच्या कामगिरीचा आराखडा तयार असल्याचे सांगून, या पुढील देखील 25 वर्षापर्यंतचा आधुनिक विकासाचा आराखडा आपल्या सरकारकडे तयार असल्याचे म्हटले आहे.आमच्या सरकारने गेल्या 10 वर्षात स्टार्ट अप इंडिया, मेकिंग इंडिया यासारख्या योजना चालू करून,देश प्रगतीपथावर नेल्याचे नमूद केले असून,जवळपास 60 कोटी लोकांपर्यंत हे उद्दिष्ट पोचल्याचे त्यांनी सांगितले. 

मागील काँग्रेसच्या काळात म्हणजेच यूपीएच्या काळात राष्ट्रीय उत्पन्नाचा दर 6.9% होता तर सध्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकाळातील दर हा 8.4.% असल्याचे त्यांनी सांगितले.आगामी लोकसभेची निवडणूक ही देशाची पुढील 50 वर्षाची आधुनिक विकासाच्या भवितव्याची ठरणार आहे.एकंदरीत सध्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीतील राजकीय वातावरण,सर्वच पक्षातील नेत्यांच्या राजकीय विश्लेषणात्मक भाषणाने सुरुवात झाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top