देशातील 543 लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार;देशभर आदर्श आचारसंहिता लागू.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

वृत्त:सोशल मीडिया

देशभरात 543 लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून,आजपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.देशभरात 543 लोकसभा मतदार संघात 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून,अनुक्रमे पहिला टप्पा 19 एप्रिल,दुसरा टप्पा 26 एप्रिल,तिसरा टप्पा 7 मे,चौथा टप्पा 13 मे,पाचवा टप्पा 20 मे,सहावा टप्पा 25 मे व सातवा टप्पा 1 जून रोजी होणार असून,त्यानंतर 4 जून रोजी एकाच वेळी,सर्व लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी होणार आहे. 

देशातील लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, सिक्कीम,अरुणाचल प्रदेश,ओडीसा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका ही पार पडणार आहेत.आज नवी दिल्ली येथे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत,देशातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून,देशभर आचारसंहिता लागू केली आहे.

 जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देश असलेल्या म्हणजे भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीकडे,संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.देशातील लोकसभेची निवडणूक पूर्णपणे निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी,देशाच्या निवडणूक आयोगाने विविध उपाय योजना केल्या आहेत.देशातील निवडणूक प्रचाराच्या काळात द्वेष पसरवणारी किंवा वैयक्तिक स्तरावर होणारी टीका रोखण्यासाठी,भारतीय निवडणूक आयोगाने गंभीर पावले उचललेली असून,कोणत्याही परिस्थितीत असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.एकंदरीतच आता देशातील 543 लोकसभा मतदारसंघात,लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या लोकसभा निवडणूक उत्सव चालू होणार असून,राजकीय वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top