देशाचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून सुखबीरसिंह संधू व ज्ञानेश कुमार यांची निवड;देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांच्या मंजुरीनंतर अधिसूचना.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

वृत्त-सोशल मीडिया.

देशाचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून सुखबीरसिंह संधू व ज्ञानेश कुमार यांची निवड,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसह त्रिसदस्य समितीने केली आहे.देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर,या नियुक्तीसंबंधी अधिसूचना जारी होईल.

 देशाचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून सुखबीरसिंह संधू व ज्ञानेश कुमार यांच्या निवडीनंतर,लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला असून,सध्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे एकच निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.नुकतेच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसह त्रिसदस्य समितीने, नवीन निवडणूक आयुक्तांची  निवड केली आहे. 

दरम्यान काँग्रेस पक्षाचे गटनेते व निवड समितीचे सदस्य अधीर रंजन चौधरी यांनी एकूण निवडणूक प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे.आगामी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर,नव्या दोन निवडणूक आयुक्तांची निवड ही, तर अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.पहिले नवीन निवडणूक आयुक्त सुखबीरसिंह संधू हे पंजाब मधील असून,यापूर्वी त्यांनी उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे,तसेच दुसरे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून निवड झालेले ज्ञानेश कुमार हे केरळमधील असून, सन 1988 च्या बॅचचे आय.ए.एस.अधिकारी आहेत,शिवाय गृह मंत्रालयात यापूर्वी त्यांनी काम केले आहे.

 एकंदरीत लवकरच देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अंतिम मंजुरीनंतर,नवीन दोन्हीही निवडणूक आयुक्तांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा होऊन,अधिसूचना निघेल असे वाटते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top