सांगलीत,सांगली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने,प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त,स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा समारंभ संपन्न.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्यावतीने,सांगली शहरजिल्ह्याचे अध्यक्ष श्री.संजय बजाज साहेब व युवक अध्यक्ष श्री.राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागचे सदस्य अभिजीत रांजणे यांनी माननीय प्रदेशाध्यक्ष श्री.आ.जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मनपा शाळा नंबर १५,सांगली येथे निबंध लेखन व चित्रकला स्पर्धा घेतल्या होत्या.सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला.सदर शाळेतील स्पर्धेमध्ये सहभागी  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची मदत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा संजय बजाज साहेब यांनी केली.

यावेळी प्रमुख पाहुणे नितीन ढाले सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होण्याचे महत्त्व बोधकथेतून समजावून सांगितले.सामाजिक न्याय विभागचे सांगली शहरजिल्ह्याचे अध्यक्ष उत्तमराव कांबळे यांनी मनपा शाळांच्या प्रगती विषयी उपाययोजना सुचवल्या. 

अभिजीत रांजणे यांनी बक्षीस स्वरूपात देण्यात आलेल्या पुस्तकांची वैशिष्ट्ये,महत्त्व,विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख सचिव डॉ.शुभम जाधव,आदर्श कांबळे यांनी सहभागी सर्वच विद्यार्थ्यांना चित्रकलेचे साहित्य वाटप केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top