सांगलीत शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न;रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही.-- माजी खासदार राजू शेट्टी.!---

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगलीत,सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालयात, शक्ती पीठ महामार्ग बाधित शेतकऱ्याच्या मेळावा संपन्न झाला व त्या मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी हे, शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बाजू मांडताना आक्रमक झाल्याचे दिसून आले.या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील,माजी आ.दिनकरतात्या पाटील,कॉ.उदय नारकर,महेश खराडे,उमेश देशमुख,सतीश साखळकर उपस्थित होते.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले-सद्या राज्यात प्रचंड महामार्ग आहेत.या महामार्गाची कनेक्टिव्हिटी देऊन सर्व देवदेवताचे दर्शन घेणे शक्य आहे.कोणाचीही मागणी नसताना हा महामार्ग करण्याची गरजच काय.?असा सवाल करून या काँग्रेस काळातच केंद्रात 2013 ला भूमी अधिग्रहण कायदा करण्यात आला.तो कायदा चांगला होता. पण त्यात केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्यात बदल केला.त्यामुळे शेतकऱ्यांना फारच कमी भरपाई मिळणार आहे.त्यामुळे या महामार्गला आमचा विरोध आहे.तो होऊ देणार नाही.

माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील म्हणाले,या रस्त्याला आमचा विरोध आहे.तो होऊ देणार नाही.मा.आ. दिनकरतात्या पाटील म्हणाले,पुरबाधित गावाचे मोठे नुकसान होणार आहे.त्यामुळे या महामार्गाला आमचा विरोध आहे.तो होऊ देणार नाही.महेश खराडे म्हणाले,राज्यात कुणाचीही मागणी नसताना,केवळ ठेकेदाराणा जगविण्यासाठी,महामार्गाचा घाट घातला जात आहे.कायदे कितीही विरोधी असले तरी बळीराजा संघटित झाला तर तो, मोदींना झुकवू शकतो हे देशाने पाहिले आहे. 

 महामार्गाला विरोध करण्यासाठी टोकाचा संघर्ष करू,त्याच बरोबर राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेऊन, मंत्रालयावर धडक मारण्याचा इशाराही त्यांनी दिला.उमेश देशमुख म्हणाले,शेतकऱ्यांना पूर्वी सारखी नुकसान भरपाई मिळणार नाही.कायदे बदलले असल्यामुळे फारच कमी मदत मिळेल!.शेतकरी भूमिहीन होणार आहेत.म्हणून या रस्त्याला विरोध आहे.यावेळी प्रभाकर तोडकर,शिवाजी मगदूम,माणिक पाटील या शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक एम.एन.कदम यांनी केले. 

आभार व्यक्त करताना सतीश साखळकर यांनी आंदोलनाची पुढील दिशा सांगितली.दि.26 मार्च 2024 ला सर्व हरकती मिरज प्रांत ऑफिस मध्ये सकाळी 11:00 वाजता जमा करण्याच्या आहेत.तसेच सोमवार दि.8 एप्रिल 2024 रोजी सांगली जिल्हा अधिकारी कार्यालय समोर भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.कार्यक्रमाला यशवंत हरूगडे,रघुनाथ पाटील,भगवान हरूगडे,सुधाकर पाटील, विलास थोरात,उदय पाटील,प्रभाकर तोडकर,गुलाबराव गायकवाड,अतुल झांबरे,अक्षय जाधव,विष्णू पाटील,राजू एडके,विलास पाटील,प्रवीण पाटील,शरद पवार,प्रवीण पाटील,घनश्याम नलवडे,भूषण गुरव,लखन पाटील,अजित धनवडे,हिंदुराव मगदूम आदिसह मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता..

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top