देशात यंदाच्या वर्षीचा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्याचा पहिला अंदाज जाहीर;देशातील शेतकरी वर्गासाठी आनंददायक-दिलासादायक बातमी.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

देशाला व महाराष्ट्राला सध्या उन्हाच्या तीव्र झळांनी  नागरिकांना घेरले असून,अशातच आज यंदाच्या वर्षीच्या मान्सूनचा पहिला अंदाज,पॅसिफिक इकॉनोमिक ऑपरेशनच्या अपेक हवामान विभागाने जाहीर केला असून, त्यानुसार यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे  हवामान विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे देशातील सर्व शेतकरी बंधू वर्गांसाठी ही एक आनंददायक- दिलासादायक बातमी असून,जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 या तीन महिन्यात देशातील पाऊसमान हे सरासरीपेक्षा जास्त असणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान कमी पाऊस पडण्यास कारणीभूत असलेल्या अल-निनो प्रणालीची ताकद मंदावणार असून,जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 या तीन महिन्यात अल-निनोची स्थिती सक्रिय होणार आहे.त्यामुळे देशातील पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहणार असल्याचे दिसत आहे.पॅसिफिक इकॉनोमिक कोऑपरेशनच्या अपेक हवामान विभागाकडून जाहीर केलेल्या अहवालात यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.

 पॅसिफिक इकॉनोमिक कोऑपरेशनच्या अपेक हवामान विभागाकडून जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात,देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून,दुष्काळाच्या घरात असणाऱ्या देशाला व महाराष्ट्राला हा एक दिलासा मिळणार आहे.याबरोबरच पॅसिफिक इकॉनोमीक को-ऑपरेशनच्या अपेक हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,आफ्रिकेचा पूर्व भाग,अरबी समुद्र, बंगालचा उपसागर,कॅरिबियन समुद्र,अटलांटिकचा उष्णकटिबंधीय भाग,इंडोनेशिया,ऑस्ट्रेलिया आदी भागांमध्ये सरासरीहून अधिक पाऊस पडणार आहे. 

येत्या आगामी काळात देशातील हवामान संस्थाकडून, यंदाच्या वर्षीचा मान्सून कसा राहील.? व प्रवास नेमका कसा होईल.? याबाबतीत अंदाज व्यक्त झाल्यानंतर, देशातील पर्जन्यमानाविषयी बोलणे महत्त्वाचे ठरेल असे वाटते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top