मुंबई येथे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या "भारत जोडो यात्रेस",सांगलीतून काँग्रेस सेवा दलाचे हजारो कार्यकर्ते मुंबईत जाणार.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

दि.16 व 17 मार्च रोजी अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी हे,मुंबई येथे भारत जोडो या यात्रेच्या निमित्ताने येत आहेत.त्यांच्या स्वागतासाठी सांगलीतून सेवा दलाचे कार्यकर्ते जे जाणार आहेत.त्यांच्या नियोजनासाठी व लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ, बुधवारी सेवा दलाचे कार्यकर्ते नियुक्त करण्यासाठी,सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाची महत्त्वाची बैठक आज दि.14 मार्च 2024 रोजी काँग्रेस भवन सांगली येथे पार पडली.

 यावेळी बोलताना सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी बोलताना जिल्ह्याचे नेतृत्व माजी मंत्री आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली,सांगली लोकसभेची निवडणुक होत आहे.सांगली लोकसभा उमेदवार म्हणून विशाल दादा पाटील यांना निवडून आणण्यासाठी,सेवा दल प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत जाऊन,प्रचार करणार आहे.त्याकरिता प्रत्येक गावातील  सेवादल कार्यकर्त्याची नियुक्ती केली जाणार आहे.त्यासाठी काँग्रेसचे उमेदवार विशाल दादा यांनाच मिळावी याकरिता,अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खर्गे, देशाचे नेते राहुलजी गांधी,सोनियाजी गांधी व अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष लालजी देसाई, प्रांताध्यक्ष नाना पटोले,सेवा दलाचे प्रांताध्यक्ष विलास औताडे यांना सेवा दलाचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मुंबई येथे भेटून त्यांना,विशाल दादा पाटील यांनाच उमेदवारी जाहीर करावी,असे निवेदन देण्यात येणार आहे असे सांगितले.यावेळी सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष व कडेगाव चे कार्याध्यक्ष सुरेश अप्पा घारगे यांनी बोलताना,जिल्ह्यामध्ये सेवा दल अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष विजय होण्यासाठी, अत्यंत तळमळीने काम करावे.त्यासाठी दि.20 किंवा 23 मार्च रोजी एक कार्यशाळा घेऊन,सर्व पदाधिकारी- कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये प्रचारा संदर्भात मार्गदर्शन करण्यात यावे.त्याकरिता विश्वजीत कदम व विशाल दादा पाटील यांचे मार्गदर्शन घेण्यात येऊन,जिल्ह्यामध्ये सेवा दल बळकट करावे.राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक अनिल मोहिते यांनी,येणाऱ्या लोकसभा निवडणूक मध्ये बोलणारे वक्ते यांची एक टीम तयार करून,प्रचार करण्यास सुरुवात करावी. 

यावेळी स्वागत व प्रास्ताविक अल्लाबक्ष मुल्ला यांनी केले व शेवटी आभार सुरज शिंदे यांनी मांडले.यावेळी प्रदेश सेवा दलाच्या राजश्री नलगे पाटील,निरीक्षक सतीश कदम,सेवा दलाच्या जिल्हा महिला अध्यक्ष प्रमिला महाडिक,आटपाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र सावंत,कवठेमंकाळचे राजू पोद्दार, वाळवाचे अध्यक्ष संदीप मोहिते,शिराळाचे अध्यक्ष तुकाराम चव्हाण,आटपाडीच्या अध्यक्षा सौ.शीला वेदपाठक,सीमा कुलकर्णी,मीना शिंदे,अनुसूचित जातीचे शहर अध्यक्ष राजेंद्र कांबळे,विठ्ठलराव काळे,बाबगोंडा पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण धोत्रे,अरुण गवंडी,सुनील ओवाळे, नामदेव पठाडे,अनिल वेदपाठक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top