महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांना व शिक्षिकेला आता यापुढे शालेय कालावधी ड्रेस कोड म्हणजेच गणवेशमध्ये असणे बंधनकारक.-- राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना व शिक्षिकेंना आता यापुढे ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आल्याची घोषणा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.महाराष्ट्र राज्यातील  सर्व व्यवस्थापनांच्या शाळे अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत  " Tr "  तर  मराठी भाषेत " टी "असे  संबोधन लावण्यात यावे.तसेच या संदर्भातील बोधचिन्ह शिक्षण आयुक्त  पुणे यांनी सुनिश्चित करून त्यास प्रसिद्धी द्यावी.तसेच संबोधन व  बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर देखील लावता येईल.

शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात तसेच जनमानसात त्यांच्याकडे गुरु/ मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते.सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात.त्यामुळे शिक्षकीय पदाची वेशभूषा ही महत्वाची असते ही बाब विचारात घेता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था,खाजगी,अल्पसंख्यांक इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित/अंशतः अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसाहित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळेतील कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत शालेय शिक्षण विभागाद्वारे पुढील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

🔹सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव शिक्षकीय पदास अनुसरून असावा.

🔸सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा. जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार / चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा.तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट,शर्ट इन करून परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/ चित्रे असलेले पेहेराव परिधान करू नयेत तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करू नये.

🔹परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी.

🔸उक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरविण्यात यावा.

🔹पुरुष व महिला शिक्षकांकरिता परिधान करावयाच्या पेरावाचा रंग कोणता असावा हे संबंध शाळेने निश्चित करावे.

🔸पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा.

🔹महिला व पुरुष शिक्षकांनी पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे ( उदा. पुरुषांनी शुज ) यांचा वापर करावा.

🔸स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचे ड्रेस राहतील

🔹वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना/ महिलांना बूट वापरण्यातून सवलत देण्यात यावी.

यापुढे महाराष्ट्र राज्यातील संबंधित शालेय कालावधीमध्ये ठराविक ड्रेस कोड मध्ये शिक्षकांना व शिक्षकेंना रहावे लागणार आहे.महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात,राज्याच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाचे,सर्वत्र स्वागत होताना दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top