रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री. देव हरीहरेश्वर मंदिर संस्थानचा,"महाशिवरात्रीचा उत्सव" सुरू.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील तीर्थक्षेत्र श्री देव हरिहरेश्वर मंदिर संस्थान मार्फत,महाशिवरात्रीचा उत्सव दि. 7 मार्च 2024 पासून सुरू असून,दि.9 मार्च 2024 रोजी श्रींची पालखी रात्री 10:00 वाजता मंदिर परिसरात फिरून सांगता होईल.दि.7 मार्च 2024 वार गुरुवार रोजी सायंकाळी ठीक 5:30 वाजता,मा.प्रांताधिकारी श्रीवर्धन तालुका यांचे शुभहस्ते प्रथम पूजा होऊन,संध्याकाळी 6:30 वाजता ह.भ.प. संदीपबुवा केळकर (रेवदंडा) यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन, श्रींची पालखी हरिहरेश्वर मंदिरात फिरेल. 

दि. 8 मार्च रोजी सायंकाळी 6:30 वाजता ह.भ.प. संदीपबुवा केळकर (रेवदंडा) यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन, रात्री 10:30 वाजता पालखी सुरुवात होऊन,श्रींची पालखी ग्रामभागात फिरून,परत श्रींचे मंदिर परिसरात येईल.

 दि.9 मार्च 2024 रोजी सकाळी 12:30 वाजता श्रींच्या महाप्रसादाचा मुख्य कार्यक्रम असून,सायंकाळी 6:30 वाजता ह.भ.प .संदीपबुवा केळकर (रेवदंडा) यांचे सुश्राव्य कीर्तन होऊन,रात्री 10:00 वाजता मंदिर परिसरात श्रींची पालखी प्रदक्षिणा होईल.तरी महाराष्ट्र राज्यातील सर्व शिवभक्तांनी,या महाशिवरात्रीच्या उत्सवास उपस्थित राहून, श्रींचे दर्शनाचा व श्रींच्या उत्सवाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन,श्री देव हरीहरेश्वर मंदिर संस्थान समितीने केले आहे. 

महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील श्री देव हरीहरेश्वर मंदिर,हे एक फार मोठे पुरातन काळातील प्राचीन अध्यात्मिक वारसा लाभलेले अत्यंत जागृत असलेले तीर्थक्षेत्र होय.तीर्थक्षेत्र श्री देव हरीहरेश्वर मंदिर हे काशी नंतरचे एक जागृत ठिकाण म्हणून व जागृत असे श्री कालभैरवनाथाचे मंदिर म्हणून शिवभक्तांना परिचित आहे.येथील श्री देव हरिहरेश्वर मंदिराची महाशिवरात्रीची यात्रा,ही महाराष्ट्र राज्यात कानाकोपऱ्यात प्रसिद्ध असून येथे देशातून व राज्यातून दरवर्षी हजारो संख्येने भक्त येत असतात.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top